
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टला (Alia bhatt) पीएनेच गंड्डा घातला असून तब्बल ७३ लाख ९० हजारांची फसवणूक केली. यासंबंधित पीए वेदिका शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जुहू पोलिसांनी तिला अटक केली आहे. या प्रकारामुळे आलियाच्या प्रोडक्शन कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही फसवणूक मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आलिया भट्टच्या आईने जुहू पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर, विश्वासघात आणि फसवणूक या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तक्रार दाखल केल्यानंतर, वेदिका फरार होऊन सतत आपले ठिकाण बदलत राहिली. तिचा शोध राजस्थान, नंतर कर्नाटक, नंतर पुणे आणि बंगळुरू पर्यंत घेण्यात आला. अखेर, जुहू पोलिसांनी तिला बंगळुरूमध्ये पकडले आणि अटक केली. याआधी देखील बॉलीवूड सेलिब्रिटींची अशाप्रकारे आर्थिक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत.