
मुंबई :
४ थी चेंबूर जिमखाना राज्य मानांकन स्पर्धा आज चेंबूर जिमखाना येथे सुरु झाली. स्पर्धेला बँक ऑफ बडोदाचा पुरस्कार लाभला असून बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवी कुमार यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. या प्रसंगी चेंबूर जिमखान्याचे सचिव डॉ. मनीष शर्मा, क्रीडा विभागाचे सचिव बाळकृष्ण परब, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, मुंबई उपनगर संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : कृषी अभ्यासाच्या प्रवेशाची किमान अट शिथील
पुरुष एकेरी गटाने सामन्यांची सुरुवात करण्यात आली. पहिल्या फेरीत मुंबई उपनगरच्या अमर भोसलेने रायगडच्या मंदार शिंदेला १९-२५, १४-८, २५-१३ अशा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून दुसरी फेरी गाठली. तर मुंबई उपनगरच्या रहीम शेखने दुसऱ्या फेरीत प्रवेश करताना मुंबईच्या अशोक गायकवाडचा २३-३, ७-२०, २५-४ असा पराभव केला.
इतर सामन्यांचे निकाल पुढील प्रमाणे
- सचिव पवार ( पालघर ) वि वि प्रदीप बारिया ( मुंबई ) १०-६, २५-२
- विशाल तोडणकर ( मुंबई उपनगर ) वि वि एल वी कृष्णमूर्ती ( मुंबई उपनगर ) २५-१५, २५-२
- सचिन बांदल ( पुणे ) वि वि सचिन जाधव ( मुंबई उपनगर ) २२-६, २५-८
- सूर्यकांत मोरे ( मुंबई ) वि वि अमोल गांगल ( ठाणे ) २५-८, २५-०
- चिन्मय भांडारकर ( मुंबई उपनगर ) वि वि विनोद बोराळे ( मुंबई ) १३-१७, २४-१०, १८-८
- सुनील वाघमारे ( मुंबई ) वि वि शोएब चौधरी ( मुंबई उपनगर ) १७-१३, २५-९
- अमेय जंगम ( मुंबई उपनगर ) वि वि शैलेश जाधव ( ठाणे ) २२-१३, २५-४
- सतीश खरात ( मुंबई उपनगर ) वि वि किरण बोबडे ( ठाणे ) १९-१३, २४-१६
- महेश कुपेरकर ( मुंबई ) वि वि देवराज कथाडे ( पालघर ) २५-१, २५-०
- अविष्कार मोहिते ( ठाणे ) वि वि किरण गुप्ता ( मुंबई उपनगर ) १८-१२, १०-२४, २५-६
- सत्यनारायण दोंतुल ( मुंबई ) वि वि अक्षय देशमुख ( ठाणे ) २५-९, २५-७