
मुंबई :
चेंबूर जिमखाना येथे सुरु असलेल्या बँक ऑफ बडोदा पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटातील उप उपांत्य सामन्यात मुंबईच्या विश्व विजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्याच आंतर राष्ट्रीय विजेत्या महम्मद घुफ्रानचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव केला. या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सातव्या बोर्डनंतर प्रशांत व घुफ्रान यांचे प्रत्येकी २० – २० असे सामान गुण होते. परंतु आठव्या बोर्डात ब्रेकचा फायदा उठवत घुफ्रानने ५ गुणांची कमाई केली आणि हा सेट २५-२० असा जिंकून आघाडी घेतली. परंतु दुसरा आणि तिसरा सेट प्रशांतने अनुक्रमे १८-८ व २०-१४ असा जिंकून उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या उप उपांत्य सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्याच गिरीश तांबेवर २५-१२, २५-२४ विजय मिळवत आगेकूच केली. तर महिलांच्या उप उपांत्य सामन्यात तीन पर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबईच्या मिताली पाठकने मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरला २५-१०, ६-२३ व २५-११ असे नमवले.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल
- झैद अहमद ( ठाणे ) वि वि महम्मद वाजिद अन्सारी ( मुंबई उपनगर ) २५-७, २५-७
- राजेश गोहिल ( रायगड ) वि वि ओमकार टिळक ( मुंबई ) २४-१०, २३-४
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल
- समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि संगीता चांदोरकर (मुंबई ) २२-१८, २५-०
- अंबिका हरिथ ( मुंबई ) वि वि निलम घोडके ( मुंबई ) २४-८, २१-१८
- ऐशा साजिद खान ( मुंबई ) वि वि आकांक्षा कदम (रत्नागिरी) २१-१३, २१-८