आरोग्य

वाडिया हॉस्पिटलमध्ये ४० बालरुग्णांना सिस्टिक फायब्रोसिसची औषधे मोफत उपलब्ध

प्रत्येकी १.५ कोटी रुपयांची औषधं पूर्णपणे मोफत उपलब्ध - पैशाअभावी रुग्णावरील उपचार थांबणार नाहीत

मुंबई :

बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने ४० मुलांना प्रत्येकी १.५ कोटी रुपयांची सिस्टिक फायब्रोसिसची औषधे मोफत उपलब्ध देण्याचा एक अनोखा उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमामुळे रुग्णाच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करत दीर्घकालीन आणि जीवघेण्या अशा सिस्टिक फायब्रोसिस सारख्या आजारावर आवश्यक उपचार प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सिस्टिक फायब्रोसिस (CF) हा एक अनुवांशिक विकार आहे जो प्रामुख्याने फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि इतर अवयवांवर परिणाम करतो. यामुळे श्वास घेण्यात अडचणी निर्माण होत असून आणि पचनक्रियेवर याचा परिणाम होतो. जनुकातील बदल किंवा उत्परिवर्तनामुळे सीएफटीआर हा विकार होतो. मुलांमध्ये दिसून येणारी या विकाराची लक्षणे म्हणजे जुनाट खोकला, वारंवार होणारा छातीचा संसर्ग, वजन वाढण्यास अडचणी येणे आणि वाढ खुंटणे. सिस्टिक फायब्रोसिस ही अशी स्थिती आहे जी वेळीच व्यवस्थापित न केल्यास फुफ्फुसांचे नुकसान आणि जीवघेणी गुंतागुंत निर्माण करते. वेळीच उपचार आणि औषधांचा वापर करुन रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता आणि कालावधी दोन्ही सुधारणे शक्य आहे. सिस्टिक फायब्रोसिस झुंजणाऱ्या बालरुग्णांकरिता हा उपक्रम एक आशेचा किरण ठरणार असल्याची प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटलच्या पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. परमार्थ चांदने यांनी व्यक्त केली.

वाडिया हॉस्पिटलच्या आधारामुळे दुसरी संधी

१४ वर्षांपासून आमचा मुलगा भाविक हा गंभीर फुफ्फुसांच्या संसर्गाने ग्रस्त असल्याने त्याची जगण्यासाठी सुरु असलेली लढाई आम्ही पाहत आहोत. आर्थिक अडचणी व मर्यादित साधनांमुळे आम्ही जवळजवळ तो बरा होण्याची आशा गमावली होती. पण आता, या मोफत आणि वेळीच उपलब्ध उपचारांमुळे आमच्या मुलाला मोकळा श्वास घेऊ शकतो आणि इतर मुलांप्रमाणेच तो देखील त्याचे आयुष्य जगू शकतो. माझ्या मुलाला आयुष्य जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल आम्ही वाडिया हॉस्पिटलचे खरोखर आभार मानतो. हा आधार आमच्या कुटुंबासाठी सर्वात मोठी आणि आशादायक बाब असल्याची प्रतिक्रिया मुरबाड येथे राहणाऱ्या रुग्णाची आई तनुजा खरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला ‘विजय दिवस साजरा करूया!

दरवर्षी असंख्य मुलं सिस्टिक फायब्रोसिस सारख्या विकाराशी झुंज देतात. त्यांना दीर्घकालीन आणि महागडे उपचार परवडत नाहीत. बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये, आम्ही केवळ उपचार करण्यावरच नव्हे तर रुग्णाला उत्तमोत्तम जीवन मिळावे यासाठी प्रयत्नशील असतो. अशा महागड्या आणि आवश्यक औषधांचा मोफत पुरवठा करून, आम्ही कुटुंबांच्या आर्थिक अडचणीकमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आर्थिप परिस्थितीमुळे कोणतेही मूल उपचारापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही ही मोहिम हाती घेतली आहे. या उपक्रमाद्वारे, आम्ही केवळ औषधे देत नाही तर या मुलांना मोकळा श्वास घेता यावा, निरोगी जीवन जगता यावे यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहोत. उपचाराकरिता रुग्णाच्या कुटुंबियांना इतरत्र भटकावे लागू नये तसेच आर्थिक अडचणींमुळे कोणोवरही उपचार करणे थांबवावे लागू नये यासाठी हा खास उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *