शिक्षण

Education: आयटीआयमध्ये ‘इलेक्ट्रीशियन’,‘फिटर’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती

मुलींसाठी असलेल्या ड्रेस मेकिंग, शिवण तंत्रज्ञान आणि कोस्मेटॉलॉजी या कोर्सेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही कोर्सेस मुलींसाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरत असल्याने मागणी वाढताना दिसत आहे.  

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) यंदाही ‘इलेक्ट्रीशियन’ आणि ‘फिटर’ या पारंपरिक कोर्सेसना (Education) सर्वाधिक पसंती मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप दोन फेऱ्या शिल्लक असल्यामुळे एकूण प्रवेशसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.राज्यातील १ हजार ४५ खासगी आणि शासकीय आयटीआयमध्ये यंदा एकूण १ लाख ४७ हजार ६१२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी तब्बल १ लाख ९७ हजार १३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तीन फेऱ्यांत एकूण ८१ हजार ११५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, त्यात ६६ हजार ८०५ मुले आणि १४ हजार ३१० मुलींचा समावेश आहे. अजूनही चौथी प्रवेशफेरी व समुपदेशन फेरी बाकी आहे. राज्यातील खासगी आणि सरकारी अशा मिळून १ हजार ४५ आयटीआय संस्था आहेत. या आयटीआयमध्ये ११६ प्रकारच्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते. यात अभियांत्रिकी विषयाचे एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम, दोन वर्षे कालावधीचेअभ्यासक्रम, बिगर अभियांत्रिकी विषयाचे एक वर्षाचे अभ्यासक्रम आहेत. यंदा इलेक्ट्रीशियन व फिटर पाठोपाठ ‘वेल्डर’ अभ्यासक्रमाला १६ हजार ८२० जागांपैकी केवळ ८ हजार १६८ प्रवेश घेतले आहेत. संगणक शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता, ‘कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट’या कोर्सला यंदा ७ हजार ६०८ जागांवर ५ हजार ४१२ प्रवेश घेतले आहेत. ‘मेकॅनिक डिझेल’ ७ हजार ८० जागांवर ४ हजार ६७९ ‘वायरमन’ या कोर्सला ६ हजार १९२ पैकी ४ हजार ३५३ प्रवेश झाले आहे. ‘मेकॅनिक मोटर व्हेईकल’ला ५६.६६ टक्के प्रवेश झाले असून ४ हजार ४०० जागांवर ४ हजार ३५३  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मुलींसाठी असलेल्या ड्रेस मेकिंग, शिवण तंत्रज्ञान आणि कोस्मेटॉलॉजी या कोर्सेसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही कोर्सेस मुलींसाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून उपयुक्त ठरत असल्याने मागणी वाढताना दिसत आहे.
……………….

तीन फेरीतील अभ्यासक्रमनिहाय असे झाले प्रवेश

 एकूण जागा…. आतापर्यंत प्रवेश
इलेक्ट्रिशियन …. २४,४४० …. १६,०४९
फिटर …. १९,५०० …. ९,१८६
वेल्डर …. १६,८२०…. ८,१६८
कॉम्प्युटर ऑपरेटर व प्रोग्रॅमिंग असिस्टंट… ७,६०८ …. ५,४१२
मेकॅनिक डिझेल …. ७,०८० ४,६७९
वायरमन…. ६,१९२ ४,३६५
मेकॅनिक मोटर व्हेईकल…. ४,४०० …. ४,३५३
ड्रेस मेकिंग …. ४,०३२ २,४९३
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक…. ३,२६० …. २,०४८
टर्नर …. २,७६० २,०७४
शिवण तंत्रज्ञान …. २,७४० …. १,२१२
मशिनिस्ट …. २,६८८…. २,०२१
कॉस्मेटोलॉजी …. २,५६८…. १,३६९
रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनर तंत्रज्ञ …. २,३७६…. १,७७१
प्लंबर …. २,०१६ …. १,१३२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *