शिक्षण

EDUCATION : अकरावी प्रवेशाची आता ओपन टू ऑल फेरी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम हा योग्य तो द्यावा अन्यथा या फेरीतूनही प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता आहे. चौथ्या फेरीचा आज (२ ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. यानंतर आता रिक्त जागांची माहिती ४ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता जाहीर होणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी कोणत्याही फेरीत प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांना मिळालेल्या प्रवेशात बदल करायचा आहे अशांना आता चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) फेरी होणार आहे. [EDUCATION]या फेरीत, ज्या महाविद्यालयात जागा रिक्त असतील अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. याचे वेळापत्रक आता लवकरच जाहीर होणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या राज्यभरात चार फेरी झाल्या तरी अजूनही लाखो विद्यार्थी प्रवेशापासून दूर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्याला हवे ते महाविद्यालय मिळावे यासाठी पसंतीक्रम काही ठराविक महाविद्यालयांचे दिल्याने अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. आता या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात
त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा दिली जाणार आहे. चार फेऱ्यांनंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (ओपन फॉर ऑल) नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात येणार असून, महाविद्यालयातील रिक्त जागांवर त्या माध्यमातून प्रवेश मिळणार आहे. प्रवेश अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक माहितीपत्रक, गुणपत्रक व प्राधान्यक्रमानुसार निवडलेली महाविद्यालयांची यादी ऑनलाइन प्रणालीत भरावी लागेल. संबंधित शाळांनीही ही माहिती पडताळून प्रमाणित करणे आवश्यक आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेशांत पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना आता होणाऱ्या या फेरीत जर अकरावीला प्रवेश हवा असल्यास शिल्लक जागांचा योग्य ताळमेळ लक्षात घेवून प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले तरच यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अजूनही मुंबई विभागात ५० हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असल्याची शक्यता आहेत.
मुंबई विभागात ४ लाखाहून अधिक जागा असल्या तरी आतापर्यत चार फेरीत कोट्यातून ४३ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी तर कॅप फेरीतून १ लाख ४६ हजार ८९० विद्यार्थ्यानी असे १ लाख ९० हजार ७९१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चार फेरीत प्रवेश घेतले आहेत.
कमी गुण मिळालेला विद्यार्थीही नामवंत महाविद्यालयांची आशा बाळगतो. यामुळे प्रवेश न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम हा योग्य तो द्यावा अन्यथा या फेरीतूनही प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता आहे. चौथ्या फेरीचा आज (२ ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. यानंतर आता रिक्त जागांची माहिती ४ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता जाहीर होणार आहे.

प्रवेशाच्या चार फेरी पूर्ण झाल्या आहेत. आता प्रवेशासाठी शिल्लक असलेल्या विद्यार्थ्याना ओपन टू ऑल फेरी असणार आहे. या फेरीचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर केले जाणार आहे. या वेळापत्रकानुसार प्रवेश घेण्यासाठी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यवाही करावी लागणार आहे.
-डॉ. महेश पालकर
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक,
…………………………
चार फेरीनंतर जिल्हानिहाय प्रवेशाची माहिती
जिल्हा…. कोटा…. कॅप …. एकूण
मुंबई (शहर/उपनगर) ….२२,८७१…. ६७,२०३…. ९०,०७४
ठाणे ….१३,९९८…. ४८,६७९…. ६२,६७७….
रायगड…. ३,२०४…. १५,५२६ ….१८,७३०
पालघर…. ३,८२८…. १५,४८२ ….१९,३१०
एकूण…. ४३,९०१…. १,४६,८९०…. १,९०,७९१
………………………………
कॅप फेरीतून प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :….2,89,124
प्रवेश घेतलेले विद्यार्थी ः 1,46,890
……………………………….
कोट्यातून दिलेले प्रवेश ः 44,454
घेतलेले प्रवेश ः 43,901

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *