
मुंबई :
भारतीय जनता मजदूर सेल आणि भारत सरकारच्या दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांची कामगार प्रशिक्षण कार्यशाळा लोणावळा येथील श्रमसाफल्य भवन आंबेकर स्मृती येथे दिनांक १ ते ३ ऑगस्ट दरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाली.
या कामगार प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये भारतीय जनता मजदूर सेलचे महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीमती ज्योती नितीन सावर्डेकर आणि दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन संस्थेच्या प्रादेशिक संचालिका श्रीमती अरुणा चोडणकर यांनी सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले. तसेच कामगारांचे हक्क, कामगार संघटनांचे कायदेशीर अधिकार, कामगार चळवळीचा इतिहास कामगार कायदे आणि त्यामध्ये झालेले बदल, असंघटित कामगारांचे प्रश्न आणि शासनाच्या कल्याणकारी योजना आणि इंडस्ट्री 4.0 च्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात कामगार संघटनेने आत्मसात करावयाचे नवीन तंत्रज्ञान, माहिती व सायबर सुरक्षितता याविषयी प्रशिक्षण डॉक्टर अमित डोंगरे आणि श्री किरण जाधव यांनी दिले.
हेही वाचा : एसटीच्या स्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाच्या कामाचा बोजवारा
या कार्यशाळेला कामगार सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर एज्युकेशन संस्थेमार्फत उपस्थित कामगारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.