मुख्य बातम्या

ELACTION:महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती

प्रभाग रचनेमधील बदलाला काही ठिकाणी विरोध झाल्याचं देखील पाहायला मिळालं.मात्र आता न्यायालयानं या याचिका फेटाळून लावल्यानंतर चित्र स्पष्ट

महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वELACTIONराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.[ELACTION] महानगर पालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभार रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हिरवा कंदील दिलाय. कोर्टाने आज महाराष्ट्रातील 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता लवकरच निवडणुकांसंदर्भात निर्णय होऊ शकतो, निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्यानं आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह या निवडणुका जाहीर होऊ शकतात. नवीन वार्ड रचनेनुसारच या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

या याचिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाला विरोध करण्यात आला होता. मात्र, आज कोर्टाने 27 आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळं महाराष्ट्रातील नगर पंचायत, नगर परिषद आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27% ओबीसी आरक्षणासह होणार आहेत. या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यापूर्वी सुप्रीम कोर्टानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात जो निकाल दिला होता, त्यातच त्यांनी स्पष्ट केलं होतं की या ज्या निवडणुका आहेत त्या, नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील, आणि प्रभाग रचना ठरवण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असेल, अशी माहिती त्यावेळीच न्यायालयानं दिली होती. मात्र त्यानंतरही एका नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल झाली होती, ती याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे, त्यामुळे आता या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहे. प्रभाग रचनेमधील बदलाला काही ठिकाणी विरोध झाल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र आता न्यायालयानं या याचिका फेटाळून लावल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आहे. आता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *