शहर

Dombivli: पॉज संस्थेने वाचविला कासवाचा जीव

कासवाला बचाव करून उपचारासाठी डॉ. रायबोले ह्यांच्या क्लीनिक मध्ये आणले

डोंबिवली ( शंकर जाधव) कल्याण मधील आधारवाडी कारागृहाजवळ जखमी अवस्थेत एक कासव दिल्याची माहिती पॉज संस्थेला देण्यात आली.[Dombivli]कासवाचा जीव वाचवण्यासाठी पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्या कासवाला बचाव करून उपचारासाठी डॉ. रायबोले ह्यांच्या क्लीनिक मध्ये आणले.

डॉक्टरांनी कासवाच्या पाठीवर उपचार केले. कासवाला इन्फ्रारेड थेरपी देण्यात आली. नेबुलयाझर ही लावण्यात आले आणि कृत्रिम ओंक्सिजन ही दिले गेले. अंतर्गत रक्तस्राव थांबण्यासाठी औषधी इंजेक्शन दिले. त्यांनंतर हे कासव कल्याण येथील वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले. पॉज ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी रजिस्टर्ड संस्था असून गेली 25 वर्षे अविरतपणे वन्यजीव पुनर्वसन करीत आहे. दरवर्षी शेकडो सरपटणारे वन्यजीव, प्राणी आणि पक्षी निसर्गात पुनर्वसन करीत आहे.

भारतीय सॉफ्टशेल कासव (Indian soft shell turtle) म्हणजे मराठीमध्ये भारतीय मृदू कवचाचे कासव किंवा गंगा सॉफ्टशेल कासव. हे एक गोड्या पाण्यातील कासवाचे प्रकार आहे, जे प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंडमध्ये आढळते.
अधिक माहिती:
वैज्ञानिक नाव:
निलसोनिया गँगेटिका (Nilssonia gangetica).
आढळ:
हे कासव गंगा, सिंधू आणि महानदी यांसारख्या नद्यांमध्ये आढळते.
आकार:
मोठे कासव असून त्याची लांबी 60 सेमी पर्यंत वाढू शकते आणि वजन 50 किलो पर्यंत असू शकते.
कवच:
त्याचे कवच मऊ आणि चपटे असते, जे त्वचेने झाकलेले असते.
आहार:
ते मासे, उभयचर, कॅरियन (मेलेले प्राणी) आणि जलचर वनस्पती खातात.
संरक्षण स्थिती:
असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे.
इतर नावे:
भारतीय अरुंद डोक्याचे सॉफ्टशेल कासव

डोंबिवली ( शंकर जाधव) कल्याण मधील आधारवाडी कारागृहाजवळ जखमी अवस्थेत एक कासव दिल्याची माहिती पॉज संस्थेला देण्यात आली.कासवाचा जीव वाचवण्यासाठी पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्या कासवाला बचाव करून उपचारासाठी डॉ. रायबोले ह्यांच्या क्लीनिक मध्ये आणले.

डॉक्टरांनी कासवाच्या पाठीवर उपचार केले. कासवाला इन्फ्रारेड थेरपी देण्यात आली. नेबुलयाझर ही लावण्यात आले आणि कृत्रिम ओंक्सिजन ही दिले गेले. अंतर्गत रक्तस्राव थांबण्यासाठी औषधी इंजेक्शन दिले. त्यांनंतर हे कासव कल्याण येथील वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले. पॉज ही ठाणे जिल्ह्यातील सर्वात जुनी रजिस्टर्ड संस्था असून गेली 25 वर्षे अविरतपणे वन्यजीव पुनर्वसन करीत आहे. दरवर्षी शेकडो सरपटणारे वन्यजीव, प्राणी आणि पक्षी निसर्गात पुनर्वसन करीत आहे.

भारतीय सॉफ्टशेल कासव (Indian soft shell turtle) म्हणजे मराठीमध्ये भारतीय मृदू कवचाचे कासव किंवा गंगा सॉफ्टशेल कासव. हे एक गोड्या पाण्यातील कासवाचे प्रकार आहे, जे प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंडमध्ये आढळते.
अधिक माहिती:
वैज्ञानिक नाव:
निलसोनिया गँगेटिका (Nilssonia gangetica).
आढळ:
हे कासव गंगा, सिंधू आणि महानदी यांसारख्या नद्यांमध्ये आढळते.
आकार:
मोठे कासव असून त्याची लांबी 60 सेमी पर्यंत वाढू शकते आणि वजन 50 किलो पर्यंत असू शकते.
कवच:
त्याचे कवच मऊ आणि चपटे असते, जे त्वचेने झाकलेले असते.
आहार:
ते मासे, उभयचर, कॅरियन (मेलेले प्राणी) आणि जलचर वनस्पती खातात.
संरक्षण स्थिती:
असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे.
इतर नावे:
भारतीय अरुंद डोक्याचे सॉफ्टशेल कासव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *