
मुंबई :
जुहू विले पार्ले जिमखान्यात सुरु असलेल्या पहिल्या जुहू विले पार्ले जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या युवा कॅरमपटू सार्थ मोरेने मुंबईच्या अनुभवी राष्ट्रीय कॅरम खेळाडू गिरीश तांबेवर सरळ दोन सेटमध्ये २५-७, २२-८ असा विजय मिळवून चौथ्या फेरीत प्रवेश केला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेचे उदघाटन जुहू विले पार्ले जिमखान्याचे कॅरम व टेबल टेनिस विभागाचे सचिव संजीव शहा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत आणि सहसचिव केतन चिखले उपस्थित होते.
तिसऱ्या फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे
- संजय मोहिते ( मुंबई ) वि वि विजय पाटील ( मुंब उपनगर ) २५-०, २५-९
- सचिन बांदल ( पुणे ) वि वि चेतन देवळेकर ( मुंबई ) २५-९, २०-१६
- जितेश कदम ( मुंबई उपनगर ) वि वि अबिद अहमद खान ( मुंबई ) २५-१७, २५-४
- सय्यद मोहसीन कासीम ( जळगाव ) वि वि संजय मंजाळकर ( पालघर ) १५-१०, २५-८
- नूर शेख ( मुंबई ) वि वि ओमकार मोरे ( रत्नागिरी ) १६-१३, २५-०
- राजेश गोहिल ( रायगड ) वि वि अर्शद अकबर शेख ( मुंबई उपनगर ) २५-८, २५-४
- महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि अक्षय देशमुख ( ठाणे ) २५-७, २५-०
- निरंज चारी ( पालघर ) वि वि अमोल पांचाळ ( मुंबई ) २५-०, २३-३
- आयुष गरुड ( पुणे ) नदीम सिद्दीकी ( मुंबई उपनगर ) १४-९, २२-१४
- सलमान खान ( मुंबई ) वि वि शांतीलाल जितिया ( मुंबई ) २५-१४, २२-१८
- जोनाथन बोनाल ( पालघर ) वि वि मुनिअप्पन राजा ( मुंबई उपनगर ) २४-१७, २७-७
- सुधाकर नायकरे ( पुणे ) वि वि राज लोके ( मुंबई उपनगर ) २५-११, ११-१५, १९-१२