शिक्षण

शालार्थ प्रणालीत शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदतवाढ द्या

अनिल बोरनारे यांची शिक्षण संचालकांकडे मागणी

मुंबई :

शालार्थ आयडी प्राप्त अनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांचे कागदपत्र अपलोड करण्याकरिता 30 सप्टेंबर मुदतवाढ देण्याची मागणी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत बोरनारे यांनी राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे लेखी निवेदन पाठवून ही मागणी केली आहे

शालार्थ आयडी प्राप्त अनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे अपलोड करण्याकरिता शासनाने 30 ऑगस्ट 2025 तारीख दिली होती. परंतु सदर कार्यवाहीसाठी अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. शालार्थ प्रणालीमध्ये खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांचे यांची दि.18/11/2012 ते दि. 07/07/2025 या कालावधीत शालार्थ आयडी प्राप्त कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश, रूजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ मान्यता आदेश अपलोड करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत. सदर अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट / वाचनीय आवश्यक आहेत. त्यानुसार सदरची कार्यवाही आहरण व संवितरण अधिकारी तथा प्राचार्य / मुख्याध्यापक (डि. डि. ओ.1) यांचे स्तरावरून अनिवार्य आहे. सदरची कार्यवाही पूर्ण न केल्यास माहे. ऑगस्ट 2025 चे वेतन देयक स्विकारले जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे संदर्भिय आदेश दिले आहे.

हेही वाचा : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा (TAIT) निकाल १८ ऑगस्टला

तथापि शिक्षणाधिकारी हे ज्यावेळी वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी दिल्यानंतर एक प्रत वेतन पथक यांना पाठवित असतात. सर्व कागदपत्रे ‘त्यांचेकडेच असून आपण कागदपत्रांची मागणी करणे हे संयुक्त्तीक नाही. सदरील कामकाजासाठी वेळ लागत असून मूळ कागदपत्रे हे संस्थेकडे असतात. ते गोळा करणे आणि कामकाज करणे, यात वेळ लागू शकतो त्यासाठी शिक्षकांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन रोखून धरणे चुकीचे असून या कामासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *