
मुंबई :
सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असतानाच युवासेने तर्फे बाप्पांच्या मूर्तीला रंग रंगोटी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. बाल वयात वही-पेन्सिल बाजुला करीत या मुलांनी हातात ब्रस-कलर घेऊन बाप्पांच्या मुर्तीला आपल्या आकलनाने सुबक रंग देऊन देखण्या मुर्त्या तयार केल्या. भांडुप येथील जॅक अँड जिल प्री स्कूल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील उपस्थित होत्या.
भांडुप पश्चिम येथील जॅक अँड जिल प्री स्कुल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. ज्युनियर, सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. युवासेनेच्यावतिने या विद्यार्थ्यांना गणेश मुर्तींचे तसेच विविध रंगांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रंगांचा योग्य पद्धतीने वापर करुन गणेश मुर्तींना रंग रंगोटी केली. त्यामुळे सर्व मुर्तीं आकर्षक दिसायला लागल्या. गणेश मुर्तीं रंगवितांना आम्ही अनेकदा पाहिल्या आहेत. रंगविलेल्या गणपती बाप्पाला घरात आणल्यावर आम्हाला प्रचंड आनंद होतो. आजही मुर्तींना रंग देताना असाच आनंद आपल्याला झाल्याचे या मुलांनी सांगितले.
हेही वाचा : ‘लालबागच्या राजा‘च्या दरबारी करणार अवयवदानाबाबत जागरूकता
हा उपक्रम चांगला असून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले. मुलांना गणेश मुर्ती तसेच रंग, ब्रस व इतर साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांचे आभार मानण्यात आले.