
मुंबई :
मुंबई विद्यापीठाचे विधी विभाग आणि सलंग्नित महाविद्यालयातील एलएलएम दोन वर्ष अभ्यासक्रमांना प्रवेशित होऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठातर्फे ऑनलाईन एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार २६ ऑगस्ट २०२५ पासून या परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते २ या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे.
हेही वाचा : नांदेड – मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०२५ असून प्रवेश अर्ज, पात्रता, नोंदणी, शुल्क आणि नियम अनुषंगिक माहिती https://uomllmcet.formsubmit.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याच संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करायचा आहे. २६ ऑगस्ट २०२५ पासून या परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते २ या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे.