
गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाचा गजर, आकर्षक देखावे आणि भव्य मिरवणुका… पण यंदाच्या उत्सवात परंपरेसोबत तंत्रज्ञानाची सांगडही बसली आहे. पहिल्यांदाच भक्तांना ‘बाप्पासोबत चॅट’ करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. ब्रँड्स मेकर संस्थेने #हॅशटॅग बाप्पा या विशेष उपक्रमांतर्गत ही डिजिटल क्रांती घडवून आणली आहे.
१६० हून अधिक मंडळांचा सहभाग :
मुंबईतील मानाच्या गणपतींसह १६० पेक्षा जास्त मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. यामुळे गणपती दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा टाळून, थेट मोबाईलवर बाप्पाचे दर्शन घेणे शक्य झाले आहे.
तुमचंही मंडळ होऊ शकतं डिजिटल!
९१३६१३६१५१ या क्रमांकावर संपर्क साधून कोणतंही गणेश मंडळ मोफत रजिस्ट्रेशन करू शकते. म्हणजेच, प्रत्येक भक्ताला आपल्या ‘मंडळाचा बाप्पा’ डिजिटल पद्धतीने अनुभवता येईल.
राज्योत्सवाला तंत्रज्ञानाची जोड :
शासनाने यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ असा दर्जा दिला आहे. त्याला जागतिक दर्जावर पोहोचवण्यासाठी हॅशटॅग बाप्पा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
यंदाचा उत्सव फक्त मंडपापुरता मर्यादित नाही…तर मोबाईलच्या स्क्रीनवरूनही बाप्पा म्हणणार – “काय मंडळी, जय देव जय देव!”
कसा होणार डिजिटल अनुभव?
फक्त क्यूआर कोड स्कॅन करा किंवा एनएफसी कार्ड टॅप करा
मंडळाची माहिती, उपक्रम, आरती-प्रसाद याबद्दल अपडेट्स मिळवा
थेट लाईव्ह दर्शन घरबसल्या पहा
अथर्वशीर्ष, गणपती स्थापनेच्या पूजेची माहिती, आरत्या – सर्व काही एका क्लिकवर