शिक्षण

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचा उमेदवार चाचपणी दौरा

मुंबई : 

राज्यात मुंबई व नाशिक शिक्षक आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचा उमेदवार चाचपणी दौऱ्यास मुंबईतून रविवार १७ मार्च २०२४ पासून सुरवात करण्यात आली. या दौऱ्यास मुंबईतील शेकडोच्या संख्येने जवळपास शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यात सर्वांनीच सक्रिय सहभाग घेतला होता.

मुलाखतीच्या वेळी इच्छुक महिला उमेदवाराची संख्या अधिक दिसून आली. शिक्षकांच्या मुलाखतीनुसार व अंतिम सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार यावेळेस निश्चितच विजयी होईल असे दिसून आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीमधील राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह राजकुमार बोनकीले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, संघटनमंत्री किरण भावठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजताई चौधरी या सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्यामार्फत मुलाखती घेण्यात आल्या. पुढील मुलाखती या लवकरच नाशिक विभागातील राज्य कार्यकारिणीच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे शिक्षक परिषदे मार्फत सांगण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *