क्रीडा

कोल्हापूरचा ओंकार पाडळकर ‘ज्यु. महाराष्ट्र श्री’

ज्युनियर स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व

पुणे :

कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या ४४ व्या ‘ज्युनियर महाराष्ट्र श्री’ किताबावर आपले नाव कोरले. रायगडच्या जीवन सपकाळला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत नाशिकची कविता शेवरे अव्वल आली.

पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत १९ जिल्ह्यांतील १२४ स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावले. या स्पर्धेत कोल्हापूरच्या ओंकार पाडळकरने जेतेपद पटकावले असले तरी या स्पर्धेवर मुंबई उपनगरचे वर्चस्व होते. ५५ ते ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याची किमया उपनगरच्याच खेळाडूंनी दाखवली. चंद्रशेखर धावडे यांच्या वतीने आयोजित स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार रवींद्र धंगेकर, प्रशांत जगताप, चंद्रशेखर धावडे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे डॉ. संजय मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शरद चव्हाण, राजेश सावंत, श्रेयश धावडे, अनिल शिंदे, किरण भिसे, इलियास शेख, योगेश कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्युनियर महाराष्ट्र श्रीचा निकाल :

५५ किलो : १. ओमकार भानसे (मुंबई उपनगर), २. हनुमान भगत (रायगड), ३. हर्षद देशमुख (रायगड), ४. शशिराज दुबे (मुंबई ), ५. सिद्धांत लाड (मुंबई उपनगर),६. दर्शन सावंत (मुंबई )

६० किलो : १. सिद्धेश सुर्वे (मुंबई उपनगर), २. प्रणय मुंडकर (रायगड), ३. रोशन पाटील (रायगड), ४. सागर ठाकूर (पुणे), ५. मयुरेश ठक्कर (मुंबई), ६. आदित्य ठोंबरे (कोल्हापूर)

६५ किलो : १. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर), २. अभय चौहान (नगर), ३. प्रतीक पाटील (पुणे), ४. दर्शन खराडे (पुणे), ५. अंगद सरोदे (जालना), ६. अथर्व करकुड (पुणे);

७० किलो : १. अतुल अधिकारी (मुंबई उपनगर), २. देवांग जाधव (मुंबई), ३. रामचंद्र सहानी (प. ठाणे), ४. चंद्रमा गौड (रायगड), ५. राहुल महाडे (पुणे), ६. संजीत कामठे (मबई)

७५ किलो : १. नवनाथ कामथे (मुंबई उपनगर), २. साहिल सावंत (मुंबई ), ३. विवेक गुप्ता (नगर), ४. ऋषिकेश बिरेदर (पुणे), ५. प्रोसेंजित दत्त (प. ठाणे), ६. जांभुळकर (पुणे)

८० किलो : १. ओंकार पाडळकर (कोल्हापूर), २. मयुर शिंदे (नाशिक), ३. ऋत्विक जाधव (पुणे), ४. उबेद समीर सय्यद (पुणे), ५. ध्रुव पवार (पुणे)

८० किलोवरील : १. जीवन सपकाळ (रायगड), २. प्रणव खातू (मुंबई ), ३. प्रणीत कदम (पुणे), ४. यश कारंडे (मुंबई), ५. प्रणव कदम (पुणे), ६. सौरभ पवार (कोल्हापूर)

मेन्स मास्टर्स (खुला गट) : १. कुमम कोयंबा (प. ठाणे), २. चिराग पाटील (पालघर), ३. नितीन ढाकळे (पुणे), ४. विश्वनाथ डोणे (पुणे), ५. महेश शिगवण (पुणे), ६. शशिकांत जगदाळे (मुंबई)

मेन्स फिजिक (खुला गट) : १. ऋत्विक जाधव (पुणे), २. आदित्य ठाणे (मुंबई ), ३. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर), ४. रोशन पाटील (रायगड), ५. प्रणव मुंडकर (रायगड), ६. साहिल सावंत (मुंबई)

मेन्स फिजिकल चॅलेंज (खुला गट) : १. सुरेश दासरी (मुंबई उपनगर), २. योगेश मेहेर (पालघर), ३. रवींद्र कदम (मुंबई), ४. अरबाज शेख सलीम (नाशिक), ५. जय भवर (प. ठाणे), ६. अज्जू भोईर (प. ठाणे)

महिला (खुला गट) : १. कविता शेवरे (नाशिक), २. रसिका हजारे (रायगड), ३. नंदिनी कांबळे (रायगड), ४. मानवी पवार (मुंबई)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *