शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा २२ मार्चपासून  

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेस २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. आजपर्यंत पदवी परीक्षेचे १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे वितरित केली आहेत. त्याचबरोबर ऐनवेळेस काही परीक्षा केंद्रात बदल झाल्यास किंवा विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र तात्काळ समजण्यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी त्याच्या लॉगिन मध्ये पीएनआर टाकल्यास त्याला त्याची परीक्षा, त्याचा आसन क्रमांक व परीक्षा केंद्र याची त्याला तात्काळ माहिती मिळते. तसेच परीक्षेच्या प्रवेश पत्रात काही दुरूस्ती असल्यास विद्यार्थी महाविद्यालयास संपर्क साधून सुधारित प्रवेशपत्र प्राप्त करून घेऊ शकतो.

विद्यार्थ्यास त्याचे परीक्षा केंद्र व इतर माहिती विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर know your examination venue या लिंकवर मिळेल असे परीक्षा व निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाने यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *