आरोग्य

अपोलो रुग्णालयात आंतरराष्ट्रीय डॉक्टरांसाठी ‘प्रोटॉन बीम थेरपी’ प्रशिक्षण

नवी मुंबई : 

अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर (एपीसीसी) हे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील पहिले आणि सर्वात मोठे प्रोटॉन थेरपी केंद्र असून आता जागतिक आरोग्य सेवेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. बेल्जियम-स्थित आयबीए च्या सहकार्याने, जगात प्रोटॉन थेरपीमध्ये अग्रगण्य असलेल्या एपीसीसी ने पीबीटी वरील प्रशिक्षण कार्यक्रमांच्या मालिकेत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधील प्रख्यात डॉक्टरांच्या पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्याचे कार्य नुकतेच पूर्ण केले. अभिमानाची बाब म्हणजे, या उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय ऑन्कोलॉजिस्टसाठी विशेष प्रोटॉन बीम थेरपी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणारा भारत हा दक्षिणपूर्व आशियातील पहिला देश ठरला आहे. पीबीटी मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणारे पहिले भारतीय कर्करोग केंद्र असल्याने, एपीसीसी सहयोगी-कर्करोगाच्या उपचारात एक नवीन अध्याय रचत आहे आणि ज्ञानाची देवाणघेवाण करत आहे, कझाकस्तान, मलेशिया, स्लोव्हेनिया आणि फिलीपिन्समधील कर्करोग तज्ञांसाठी तत्सम प्रशिक्षण लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.

एच.ई. डिडिएर वॅन्डरहॅसेल्ट, बेल्जियमचे भारतातील राजदूत, कार्यक्रम प्रमुख पाहुणे, या प्रसंगी म्हणाले, “बेल्जियम आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर, आरोग्य सेवेत अग्रगण्य प्रगती झाली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की यामध्ये आमचे मोलाचे सहकार्य आहे. कर्करोगाच्या उपचारांमध्ये नावीन्य आणि उत्कृष्टता निर्माण करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देताना बेल्जियमला आनंद वाटत आहे.”

डॉ. प्रीथा रेड्डी, कार्यकारी उपाध्यक्षा, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस लिमिटेड म्हणाल्या, “ही युती म्हणजे जागतिक आरोग्य सेवेमध्ये भागीदारी विकसित करण्याच्या आमच्या समर्पण वृत्तीचा जणू पुरावा आहे. आम्ही जगभरातील कर्करोगाचा सामना करण्यासाठी आमची सामूहिक क्षमता लक्षणीयरीत्या वाढवत आहोत. त्यामुळे ज्ञानाची देवाणघेवाण अखंडितपणे सीमेपलीकडे करता येते. या भागीदारीमुळे ऑन्कोलॉजिस्ट जागतिक स्तरावर प्रोटॉन बीम थेरपीच्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येईल. लोक जगभरातील नाविन्यपूर्ण उपचार सहज प्राप्त करु शकतील, त्यामुळे प्रगत उपचार प्रत्येकाच्या आवाक्यात असेल. म्हणूनच ही आरोग्यसेवेतील एका नवीन युगाची सुरुवात आहे.”

डॉ.गुयेन थी मिन्ह ह्यू, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, चो रे हॉस्पिटल, व्हिएतनाम म्हणाले, “अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटरमधील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतल्यामुळे प्रोटॉन बीम थेरपीमधील कौशल्ये आणि ज्ञान वाढवण्याची एक चांगली संधी आम्हाला मिळाली आहे. या ज्ञानामुळे आम्हाला आमच्या रूग्णांची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करता येईल आणि व्हिएतनाममधील कर्करोगाच्या उपचारांच्या विकासात सक्षमतेने योगदान देता येईल.”

डॉ.फेब्रिओनो बसुकी राहर्जो, एचओडी-रेडिएशन ऑन्कोलॉजी, धर्माईस नॅशनल कॅन्सर सेंटर, इंडोनेशिया म्हणाले, “भारत देश हा कर्करोगाच्या सेवेतील जागतिक दर्जाच्या कौशल्याचा एक दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि हे केंद्र म्हणजे उत्कृष्टतेच्या या वचनबद्धता उत्तम उदाहरण आहे. या प्रशिक्षणाद्वारे, पीबीटीचे फायदे इंडोनेशिया आणि त्यापलीकडील अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचवणे आणि आमच्या प्रदेशातील कर्करोगाच्या उपचारांचे परिणाम सुधारणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *