शिक्षण

मुंबई विद्यापीठाची बीकॉम सत्र ६ ची परीक्षा सुरू

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या उन्हाळी सत्राची बीकॉम सत्र ६ ची परीक्षा आजपासून ( दिनांक २२ मार्चपासून) सुरू होत आहे. या परीक्षेला ५४ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी बसले आहेत.

मुंबई विद्यापीठाची तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ ची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. या परीक्षेला ५४,८३४ विद्यार्थी बसत आहेत. या परीक्षा मुंबई विद्यापीठाच्या मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातील २४९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहेत. विद्यापीठाने सर्व मुख्य महाविद्यालयाची एक बैठक घेऊन उन्हाळी सत्राच्या सर्व परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. परीक्षा घेणे व त्याचबरोबर मूल्यांकन करणे हे महाविद्यालयाला आवश्यक आहे. प्रत्येक महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थी संख्येच्या दीड पट उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जेणेकरून निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल. या सर्व लीड महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे यांनी संबोधित केले.

सर्व महाविद्यालयाने परीक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी परीक्षेची प्रवेशपत्रे, विविध महाविद्यालयातील परीक्षा केंद्रे याचा आढावा परीक्षा व निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी घेतला होता. महाविद्यालयाला परीक्षेचे साहित्य व उत्तरपत्रिका तसेच ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीचा आढावा कॅपचे उपकुलसचिव संतोष सोनावणे यांनी घेतला होता.तर परीक्षेची प्रश्नपत्रिका डिजिटल इलेक्ट्रॉनिक पेपर डिलिव्हरी पद्धतीमार्फत

२४९ परीक्षा केंद्रांना पाठविण्यात येणार आहे. याचा आढावा उपकुलसचिव सुनील खतेले यांनी घेतला. या परीक्षेचे मूल्यांकन ऑनस्क्रीन मार्किंगद्वारे करण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन उपस्थिती, बारकोड व विद्यार्थ्यांची सर्व माहिती असणाऱ्या स्टिकरचाही वापर करण्यात येत आहे असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

उन्हाळी सत्रातील परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात. त्यादृष्टीने मुंबई विद्यापीठाने संपूर्ण तयारी केली आहे. या परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात येईल.परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.

– डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

बीकॅाम सत्र ६ परीक्षा सांख्यिकी

  • एकूण परीक्षार्थी : ५४,८३४
  • एकूण परीक्षा केंद्रे : २४९
  • एकूण विद्यार्थिनी : २६,१७२
  • एकूण पुरुष विद्यार्थी : २८,६६२
  • एकूण नियमित विद्यार्थी : ४८,३१५
  • एकूण पुनर्परिक्षार्थी : ६५१९
  • दिव्यांग विद्यार्थी : १९६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *