शहर

गोविंदांचे पिक्चर चालत नाहीत, एखादा चालणारा नट घ्यायचा – जयंत पाटील

महाविकास आघाडीत सामंजस्याचं वातावरण, सर्व पक्षांचा एकमेकांशी चांगला संवाद

मुंबई : 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये आमच्या वाटेला येणाऱ्या दहा ते अकरा जागेवर उमेदवारांसंदर्भात चर्चा करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला राजाभाऊ खोब्रागडे यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाने शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांचे विचार मानणाऱ्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले की, हातकणंगले मतदारसंघाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना दिला आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे आणले, शेतकरी विरोधी निर्णय घेतले. याबाबत राजू शेट्टी केंद्र सरकारविरोधात असतील तर त्यांनी महाविकास आघाडी सोबत यावं असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, आमचा उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया आम्ही केली आहे. आणि आज इच्छूक उमेदवार पण भेटून गेले. येत्या एक दोन दिवसात आम्ही बैठक घेऊन उमेदवार जाहीर करू. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना अशाप्रकारे नोटीस देणे योग्य नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मला काही शक्य वाटत नाही असे काही घडले. उलट प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर यावे असे आम्हाला वाटते. अजूनही त्यांनी विचार करावा आणि एकत्रित यावे. अभिनेता गोविंदांचे पिक्चर आता चालत नाहीत, त्याचा शेवटचा पिक्चर फ्लॉप गेला, त्यामुळे हे आता नवीन काहीतरी असं म्हणत एखादा चालणारा नट तरी घ्यायचा असेही जयंत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *