क्रीडा

५१ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

मुंबई :

५१ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा ६ ते १० एप्रिल २०२४ दरम्यान ग्वालियर, मध्य प्रदेश येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने गेल्या वर्षभरातील कामगिरीनुसार महाराष्ट्राचा संघ निवडला आहे. संघातील प्रत्येक खेळाडूस गणवेशाचे २ सेट, हातखर्ची प्रवास भत्ता प्रत्येकी १,००० रुपये व वातानुकूलित रेल्वे प्रवासाची व्यवस्था महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा संघ

  • पुरुष संघ : विकास धारिया, सागर वाघमारे, अभिषेक चव्हाण, निसार अहमद शेख, हरेश्वर बेतवंशी, गिरीश तांबे आणि केतन चिखले (संघ व्यवस्थापक)
  • महिला संघ : श्रुती सोनावणे, केशर निर्गुण, अनिता कनोजिया, रिंकी कुमारी, सेजल लोखंडे, मधुरा देवळे आणि स्नेहा मांजरेकर (संघ व्यवस्थापक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *