क्रीडा

इंडियन इनडोअर स्पोर्ट्स फाउंडेशन – भारतीय पुरुष संघ अंतिम फेरीत श्रीलंकेविरुध्द खेळणार

कोलंबो :

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत भारताने साखळीतील शेवटचे दोन्ही सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. इंग्लंडने साखळीत केलेल्या पहिल्या पराभवाची सव्याज परतफेड करताना अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. गुणतालिकेत श्रीलंका प्रथम स्थानावर असून पाठोपाठ भारत सुध्दा दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड व सिंगापूर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर असून अंतिम सामन्यातून बाहेर फेकले गेले आहेत.

आज भारतीय संघाने इंग्लंडच्या पहिल्या पराभवाची सव्याज पराभवाची परतफेड करत स्पर्धेत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत अंतिम फेरीत स्थान मिळवले. भारतीय संघ गुणी असून अंतिम फेरीत भारत चमकदार कामगिरीची नोंद करेल असे प्रशिक्षक जयेश साळगावकर यांनी स्पष्ट केले. आज झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात १०२ धावा करताना सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व राखले होते. या सामन्यात भारताच्या विजय गौडाने (१६ धावा, १ बळी), धनुष भास्कर (१९धावा १ बळी), आफ्रोज पाषा (१९ धावा व २ बळी), कार्थिक सुब्रमनियन (१८ धाव ) व दैविक राय १ बळी) यांनी जोरदार कामगिरी करताना इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. तर इंग्लंडच्या अनिश पटेल (१७ धावा), टॉम क्लार्क (१३ धावा १ बळी) व कॉर्नर रॉफ (१० धावा व २ बळी) यांची कामगिरी चांगली झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *