मुंबई :
मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका १० ते १२ हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसापूर्वी फेसबुक या समाज माध्यमावर आल्यावर पुणे येथील एका व्यक्तींनी ती जाहिरात पाहून, त्याने काही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲप वर एक बनावट गुणपत्रिका मिळाली, अशाप्रकारची माहिती विद्यापीठास प्राप्त झाली आहे. याची विद्यापीठांनी गंभीर दखल घेतली आहे.यावर मुंबई विद्यापीठ पोलीस स्थानकांमध्ये याची सायबर तक्रार नोंदविणार आहे. विद्यार्थ्यांनी अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.
पुणे येथील एका व्यक्तींने फेसबुक या समाज माध्यमावर मुंबई विद्यापीठाची पदवी घरी बसून एका दिवसात १० ते १२ हजारात मिळेल अशी जाहिरात पाहिली त्याने त्या जाहिरातीतील फोनवर एका व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने २००० रुपये ऍडव्हान्स मागितले, ऍडव्हान्स रक्कम भरल्यानंतर त्याच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका प्राप्त झाली अशी माहिती मुंबई विद्यापीठास प्राप्त झाली. याची गंभीर दखल मुंबई विद्यापीठाने घेतली व पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत यानुसार पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
अशाप्रकारच्या कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. ही पदवी किंवा गुणपत्रिका बनावट आहे. फोटोशॉप किंवा इतर साधनाचा वापर करून बनावट गुणपत्रिका किंवा पदवी बनविली आहे. या सोबत ज्या व्यक्तींनी गुणपत्रिका घेतली आहे. तीच बनावट आहे. एप्रिल २०२३ ची बीएससी सत्र ६ ची कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे तसेच पदवी देणाऱ्यांवर व पदवी घेणाऱ्यांवर मुंबई विद्यापीठ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.