शिक्षण

दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा ९५.८१ टक्के निकाल लागला

मुंबई :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या दहावीचा एकूण निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. नेहमी प्रमाणे यंदाही निकालात मुलींचीच सरशी आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९४.५६ आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत एकूण निकालात १.९८ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी राज्याचा दहावीचा एकूण निकाल ९३.८३ टक्के इतका लागला होता. मुलींचा निकाल मुलांच्या निकालांपेक्षा २.५६ टक्के अधिक आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाची घोषणा केली.यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह राज्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. १८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *