शिक्षण

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीत महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठ अव्वल

मुंबई :

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुंबई विद्यापीठाने एनईपीनुसार नवीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले यात १६,३४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यांची प्रथम सत्राची परीक्षा होऊन निकालही जाहीर झाले व या विद्यार्थ्यांची डिजिटल गुणपत्रिका त्यांच्या लॉगिनमध्ये तसेच डिजीलॉकरवरही ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना देशात तसेच परदेशात होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण पूर्णपणे अंमलबजावणी करणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रात सर्वप्रथम आहे. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठेही मुंबई विद्यापीठाचे अनुकरण करीत आहेत.

१६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग, संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर विभाग व स्वायत्त महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विभाग अशा २७५ महाविद्यालयातील २२६ अभ्यासक्रमात नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम तयार केले. यात पदव्युत्तर अभ्यासक्रमात एकूण १६,३४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात व स्वायत्त महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात एनईपी नुसार प्रवेश झाले आहेत. हे प्रवेश ईसमर्थ या क्लाऊड या वेबबेस पोर्टलद्वारे करण्यात आले. सदर पोर्टल केंद्र शासनाचे आहे.

ईसमर्थ पोर्टलद्वारे निकाल जाहीर

आजपर्यंत मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील ६५ अभ्यासक्रमाचे निकाल ईसमर्थ पोर्टलद्वारे जाहीर झाले आहेत. पूर्वी एमए, एम.कॉम व एम.एस्सी यामध्ये त्यांच्या सर्व विषयांचे एकत्रित निकाल जाहीर केले जात असत. यामुळे सर्व विषयांचे मूल्यांकन झाल्याशिवाय निकाल जाहीर होत नसत. एखाद्या विषयाचे मूल्यांकन होऊन देखील इतर विषयांच्या मुल्यांकनासाठी थांबावे लागत असत. यामुळे निकालास उशीर होत असे. आता एमईपीमध्ये प्रत्येक विषयाचा स्वतंत्र निकाल जाहीर केला जात आहे. ज्या विषयाचे मूल्यांकन झाले त्या विषयाचा निकाल तत्काळ जाहीर केला जातो. समर्थद्वारे एनईपीचे प्रवेश व निकाल जाहीर करण्यासाठी प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, डिआयसीटीचे प्र. संचालक डॉ. प्रवीण सिनकर, तांत्रिक सल्लागार डॉ. हिरेन दंड, उपकुलसचिव अशोक घुले व अजित भोसले यांनी विशेष प्रयत्न केले.

निकालाचे वैशिष्ट्ये

  • ईसमर्थ या पोर्टलद्वारे परीक्षा घेऊन वेबबेस निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रात सर्वप्रथम बनले आहे.
  • प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रवेश व निकाल एनईपीनेच जाहीर होणार
  • याची डिजिटल गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर व डिजीलॉकरवर तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • या निकालाचा डेटा हा क्लाऊड बेस आहे.
  • क्रेडिट ट्रान्स्फर सुलभ होणार
  • क्रेडिट बँकेत क्रेडिट जमा होणार
  • मल्टिपल एन्ट्री व मल्टीपल एक्झिटला फायदा
  • क्रेडिटचे एकत्रीकरण होणार

भविष्यात कागदपत्रे इतिहासजमा

या डिजिटल गुणपत्रिकेमुळे भविष्यात मुद्रीत गुणपत्रिका इतिहासजमा होईल. हा सर्व डेटा क्लाउड बेस असल्याने केव्हाही आणि कोठेही ही कागदपत्रे उपलब्ध होतील. यामुळे दुय्यम गुणपत्रिका काढण्याची आवश्यकता असणार नाही. कागदपत्रे पडताळणी तात्काळ होईल. विद्यापीठाचा गुणपत्रिका विभाग व मुद्रण विभागावरील कार्यभार कमी होईल. कारण ही सर्व कागदपत्रे डिजीलॉकर क्लाउड बेस स्वरूपात सुरक्षित राहतील.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्रात सर्वप्रथम समर्थद्वारे एनईपीचे प्रवेश व निकालाबरोबरच अनेक प्रोग्राम सुरू केले आहेत. व यशस्वीरित्या सुरू आहेत. हे पाहूनच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना मुंबई विद्यापीठ एनईपी बाबत मार्गदर्शन करणार आहे.

– डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *