शहर

विकास हायस्कूलला बदनाम करण्याचे थांबवा : जनता दल विक्रोळीचे आवाहन

मुंबई :

ज्या शाळेने कन्नमवार नगर घडविले, त्या शाळेला बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. तेव्हा विकास हायस्कूलला बदनाम करण्याचे थांबवा, असे आवाहन जनता दल विक्रोळी तालुकाध्यक्ष यतीन तोंडवळकर यांनी केले आहे.

याबाबत म्हणणे असे की, इमारत क्रमांक २४० येथे विकास हायस्कूलच्या विरोधात फलक लावून सबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेने भला मोठा फलक लावून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला. यामुळे विकास हायस्कूलची प्रतिमा मलिन होण्यास मदत झाली आहे. सबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेने याबाबत ज्या प्राधिकरणाकडे तक्रार करायची होती. तेथे करून वाद वाढवायचा नव्हता. सबंधित प्राधिकरण आणि शाळा व्यवस्थापन यांनी ते पाहून घेतले असते. या आधीही ज्या ठिकाणी शाळा होती त्या एका इमारतीचा संपूर्ण पुनर्विकास झालेला आहे. याकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो. आज ना उद्या सबंधित सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्विकासाला जाणारच होती. आणि त्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचा फलक सबंधित सहकारी गृहनिर्माण संस्था च्या आवारात लागलेला आहे. तरीही वाद निर्माण करून निनावी फलक लावून शाळेला बदनाम करण्यात आले.

शाळा हे विद्येचे मंदिर आहे, या मंदिराला बदनाम करु नका. सबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेने सदर फलक काढून शाळेचा मान राखावा, अन्यथा गांधीवादी मार्गाने आंदोलन करू, असे जनता दलाने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *