आरोग्य

नवजात बाळाला झाला स्वरयंत्राचा पक्षाघात; डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न पण…

वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले नवे आयुष्य

मुंबई :

जन्मत:च स्वरयंत्राचा पक्षाघात झालेल्या बाळावर वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करुन त्याला नवे आयुष्य मिळवून दिले. नवजात मुलांमध्ये दुहेरी स्वरयंत्रासंबंधीत पक्षाघात दुर्मिळ आहे. या आजारामध्ये स्वरयंत्रात असणाऱ्या दोन्ही स्वरतंतूंची हालचाल पूर्ण किंवा अंशतः बंद होते. यामुळे बाळची बोलण्याची क्षमता नष्ट होते.

राखी आणि संदेश खारवी या जोडप्याला झालेल्या बाळामुळे त्यांना अतिशय आनंद झाला. मात्र बाळाला श्वासोच्छवासासंबंधीत तक्रारींचा सामना करावा लागल्याने पालकांचा आनंद अल्पकाळ राहिला. ६ ते १२ तासांच्या आत त्यावर स्थानिक रुग्णालयात केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याने त्याला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात दिवसांच्या या अर्भकाला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपिक मूल्यांकनानंतर स्वरयंत्रासंबंधीत पक्षाघाताचे निदान झाले. नवजात मुलांमध्ये दुहेरी स्वरयंत्रासंबंधीत पक्षाघात दुर्मिळ आहे. या आजारामध्ये स्वरयंत्रात असणाऱ्या दोन्ही स्वरतंतूंची हालचाल पूर्ण किंवा अंशतः बंद होते.

वेळेवर निदान आणि उपचारावर जोर देत वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी सबग्लोटिक बलुनसह एन्डोस्कोपिक क्रिकॉइड या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीने ११ मे रोजी बाळावर तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाला दोन आठवडे जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. या तंत्राची परिणामकारकता, अचूकता, सुरक्षितता आणि जलद पुनर्प्राप्तीने लहान मुलांच्या वायुमार्गाच्या विकारांचे रूपांतर करण्याची क्षमता यामुळे बाळाच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा झाली. ६ जून रोजी बाळाला घरी सोडण्यात आले. नवजात शिशु तज्ज्ञ तसेच कान, नाक, घसा विकार तज्ज्ञांच्या तुकडीने या बाळावर यशस्वी उपचार केले. बाळाला नवीन आयुष्य मिळाल्याबद्दल संदेश खारवी यांनी वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *