मनोरंजन

‘अष्टपदी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात

खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त

मुंबई : 

‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आजवर गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत.

निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. उत्कर्ष जैन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. श्रीगणेश गीताच्या रेकॅार्डिंगने ‘अष्टपदी’चा मुहूर्त झाल्यानंतर सध्या या चित्रपटाची संपूर्ण टिम कोल्हापूर मुक्कामी आहे. कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी खासदार छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुहूर्त पार पडला. याप्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मुहूर्त क्लॅप दिला तसेच चित्रपटाच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर आणि आसपासच्या भागांमध्ये या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग चित्रीत केला जाणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या चित्रीकरणाबाबत दिग्दर्शक उत्कर्ष जैन म्हणाले की, करवीर निवासिनी अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या कोल्हापूर नगरीमध्ये ‘अष्टपदी’चं चित्रीकरण करत असल्याचा एक वेगळा आनंद आहे. चित्रपटाची संपूर्ण टिम नवीन उर्जेने आणि प्रचंड ताकदीनिशी तयारीला लागली असून आजवर कधीच रुपेरी पडद्यावर न आलेलं कथानक प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याची ग्वाही देखील उत्कर्ष यांनी दिली.

संतोष जुवेकर ‘अष्टपदी’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून मयुरी कापडणे, अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, मिलिंद दास्ताने, विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, नयना बिडवे आदी कलाकार कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘अष्टपदी’चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक असलेल्या महेंद्र पाटील यांनी अष्टपैलू कामगिरी करीत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. संगीतकार मिलिंद मोरे यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभलं आहे. सिनेमॅटोग्राफी डिओपी धनराज वाघ करणार असून, कला दिग्दर्शन निलेश रसाळ यांचं आहे. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून अजय खाडे कार्यकारी निर्माते आहेत. रंगभूषा अतुल शिधये करीत असून वेशभूषा अंजली खोब्रेकर यांची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *