मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पुढाकाराने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने दादर येथे सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रासाठी खेळाडूंची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज सायंकाळी ५ ते ९ दरम्यान या वातानुकूलित केंद्रात खेळाडूंना सराव करता येणार आहे. शिवाय दर शनिवारी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत राज्यातील युवा मुला मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून सरावासाठी व प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ४० खेळाडूंची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
असोसिएशनने राज्यातील राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय विजेते तसेच छत्रपती पुरस्कारार्थी कॅरम खेळाडूंना या केंद्रात मोफत सराव करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी दिली. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी दिनांक २९ जुन २०२४ पर्यंत संजय बर्वे भ्रमणध्वनी क्रमांक ९१३७५७८९७८ / ९९६९६०६०८२ यांच्याशी संपर्क साधावा.