शहर

म्हाडा लॉटरीतील विक्रोळीतील घर विजेते पहिल्याच पावसात हैराण

घराला गळती लागल्याने नागरिक त्रस्त

मुंबई :

मुंबईत घर घेण हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न म्हाडा पूर्ण करतं. स्वस्तात मस्त घर अशी म्हाडाची ओळख. मात्र गेल्या अनेक वर्षात म्हाडाची ही ओळख पुसत चालली आहे. नुकत्याच मुंबई म्हाडाच्या लॉटरी विक्रोळी येथे अनेकांना घर लागली. मात्र या घरात पहिल्याच पावसात गळती लागली असून या इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत . त्यामुळे घर विजेते हैराण आहेत.यामुळेच आता म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

२०२३ म्हाडा मुंबई लॉटरी मध्ये अनेक ठिकाणी घर निघाली होती. त्यामध्ये मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथे देखील ४१५ स्कीम हा म्हाडाचा एक प्रोजेक्ट झाला. त्यात अनेकांना घर लागली. हे घर साधारण प्रत्येक विजेत्याला ४० लाख रुपयाला पडले. मात्र त्या बदल्यात विजेत्यांना घरात राहिला आल्यापासून फक्त समस्याच जाणवत आहेत. एकीकडे पाणी न येणं, लिफ्ट चा प्रॉब्लेम, पार्किंगचा प्रॉब्लेम ते कमी तर त्यात आता पावसाळ्यात घराला गळती लागली आहे. त्यामुळे विक्रोळी ४१५ म्हाडा घर विजेते त्रस्त आहेत.

कर्ज काढून मुंबईत घर घ्याव या दृष्टीने आम्ही येथे अर्ज भरून घर घेतला. मात्र आमची हिरमोड झाली आहे. घरात राहिला आल्यापासून अनेक समस्यांना आम्हाला सामोरे जावे लागत आहे. पाणी प्रश्न, पार्किंग, लिफ्ट समस्या अशा अनेक समस्यांना आता सध्या आम्हाला सामोरे जावे लागतंय.यात आता पाऊस पडतोय आणि आमच्या सर्व घरांना लिकेज होऊ लागले आहे. त्यामुळे घर घेतलं ही आमची चुकी झाली का असा प्रश्न आम्हाला पडला आहे असा या ठिकाणी राहणारे रहिवासी सांगतात.

तर काही रहिवासी या महाडाच्या इमारतीच्या बांधकामावर प्रश्न उपस्थित करतात. पहिलाच पाऊस पडलाय तीन विंग मध्ये सर्वत्र घरामध्ये लिकेज पाहायला मिळतोय. आत्ताच ही परिस्थिती आहे तर पुढे काय? ज्या बिल्डरने ही घर बांधलेली आहेत त्याच्यावर म्हाडा प्रशासनानेचौकशी करून कारवाई करायला हवी. तसेच आमच्या इमारतीची व्यवस्थित पाहणी करून काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात.

२०२३ मुंबई बोर्डाच्या लॉटरीमध्ये ही घरं सर्वांना लागलेली आहे. स्कीम क्रमांक ४१५, पॉकेट फोर इमारत ही आहे. इमारतीमध्ये तीन विंग आणि २५८ घरं आहेत. सध्या शिर्के बिल्डरकडे या इमारतीचे वर्षभरासाठी मेंटेनन्स चार्ज आहे. नवीन म्हाडाच्या इमारतीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात घर विजेते वारंवार बिल्डरकडे पत्रव्यवहार करत आहेत. मात्र त्याला बिल्डर प्रशासनाकडून कोणतीही दाद देण्यात येत नाही. त्यामुळे आता घर विजेते हे महाडा प्रशासनाकडे दाद मागणार आहेत.

विक्रोळी स्कीम क्रमांक ४१५ म्हाडा नव्या इमारतीमध्ये असणाऱ्या गळती प्रकरणी म्हाडा प्रशासनाने अद्याप कोणतेही प्रतिक्रिया दिलेली नाही. विक्रोळी येथील नव्या घरांची ही परिस्थिती असेल तर म्हाडा कडून राज्यभरात अनेक ठिकाणी देण्यात येणाऱ्या नव्या घरांची काय परिस्थिती असेल हे विचार न केलेलंच बरं. या इमारतीच्या घटनेनंतर म्हाडामार्फत अनेक बिल्डर कडून अशाप्रकारे ढिसूळ बांधकाम होत असेल तर म्हाडा प्रशासनाने यासंदर्भात दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे असं म्हाडा घर विजेते आणि लॉटरीसाठी अर्ज करणारे सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *