मुंबई
पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालयया ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्राचे अनेक जिल्ह्यातून नामवंत खेळाडू आले होते. या स्पर्धेत सीनियर मुले मध्ये”व्यंकटेश कोनार” (उपनगर मुंबई) हा “स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र, सीनियर”२०२४ किताबाचा विजेता झाला. तर मुलीमध्ये काजल भाकरे (ठाणे जिल्हा) स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र, (सीनिअर)२०२४ या या किताबाची मानकरी झाली.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये आपल्या वैयक्तिक कामगिरी द्वारे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उज्वल केलेले खेळाडू विलास दळवी आणि महिला खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त , महाराष्ट्र शासन कक्ष अधिकारी (सेवानिवृत्त) विजया नर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर संघटनेचे हितचिंतक आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना सुद्धा “जीवन गौरव पुरस्कार” क्रीडा पत्रकारिते बाबत देण्यात आला. संघटनेने पत्रकारितेमध्ये हा प्रथमच पुरस्कार दिला.
सन्मानचिन्ह ,शाल व श्रीफळ , पत्नीसाठी सौभाग्य लेण या सोबत रोख रक्कम देण्यात आली. या पुरस्काराने क्रीडा पत्रकार सुहास जोशी, तसेच माजी खेळाडू विलास दळवीआणि आणि विजया नर यांनी संघटने कडे आपुलकीची भावना व्यक्त करून संघटनेचे आभार मानले. यापूर्वी महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन जीवन गौरव पुरस्काराने २०२०-२१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त मधुकर पाटकर सर (ठाणे), दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त दिलीप केळुसकर सर (मुंबई), २०२२-२३ मध्ये विश्वनाथ सावंत (राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू मुंबई),२०२३-२४ साठी विलास दळवी, विजया नर आणि पत्रकारितेचा पहिलाच जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना दिला.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
महिला गट
४७ किलो
१) काजल भाकरे (ठाणे)
२) हर्षदा घुले (मुं. उ.)
३) मानसी हांडे (मुं.उ )
५२ किलो
१) योगिता गायकवाड (मुं.उ.)
२) मीनाक्षी जाधव (पुणे)
५७ किलो
१) शुभांगी पाटील (कोल्हापूर)
२) निवेदिता खारकर (मुंबई)
३) अनंता बारुहा, (संभाजीनगर )
६३ किलो
१) सेजल मकवाना (मुं.उ.)
२) आदिती सांगळे (ठाणे)
३) रमय्या तारवडी (ठाणे )
६९ किलो
१) अक्षया शेडगे (नवी मुंबई )
२) प्रेरणा साळवी (ठाणे )
३) प्रिया कांदळकर (मुं.उ.)
७६ किलो
१) रुबी दास (मुंबई )
२) सेजल मोईकर (पुणे)
३) तृप्ती सावंत (मुंबई )
८४ किलो
१) अश्लेषा गुडेकर (मुं.उ.)
२) प्रतिभा लोणे (ठाणे )
३) शिवानी गुरव (पुणे)
८४+किलो
१) मृणाली भोग.(पुणे)
२) वैशाली तांडेल (मुंबई)
३) सुप्रिया मालवडकर,(पुणे)
पुरुष गट
५३ किलो
१) धर्मेंद्र यादव (मुंबई)
२) नीरज यादव (मुं.उ.)
३) प्रशांत दुुमडे.(ठाणे)
६६ किलो
१) वेंकटेश कोणार (मुं उ.)
२) साहिल उतेकर.(मुंबई)
३) अमोल करगुटकर (मुं. उ.)
७४ किलो
१) प्रांजल पाटेकर (ठाणे)
२) वैभव थोरात (संभाजीनगर)
३) दीपक शाहू (पालघर)
८३ किलो
१) अक्षय दीडवाघ (सातारा)
२) जितेंद्र यादव (मुंबई)
३) मोहित गमरे (संभाजी नगर )
९३ किलो
१) विवेक सांबरे (ठाणे)
२) रवींद्र साळवे (संभाजीनगर)
३) कुणाल राठोड (संभाजीनगर)
१०५ किलो
१) ऋतुराज पाटील (कोल्हापूर)
२) अश्विन सोलंकी (मुंबई)
३) संकेत चव्हाण (मुं.उ.)
१२० किलो
१) जितेन राणे (मुं.उ.)
२) अजिंक्य पडवणकर (मुंबई)
३) राजेश शेटे. (मुंबई )
१२०+ किलो
१) चैतन्य शास्त्री (पुणे)
२) रितीक पोळ.(रायगड)
या राज्य स्पर्धेतून २० ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत कोलकत्ता- पश्चिम बंगाल या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली आहे.