क्रीडा

पुणे येथे कै विनायक निम्हण राज्य कॅरम स्पर्धेला प्रारंभ

पुणे : 

माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ सनीज वर्ल्ड येथे येथ आयोजित केलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उदघाटन सकाळी १० वाजता सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी व आंतर राष्ट्रीय कुस्तीपटु अमोल बुचडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सायकलिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, जिजामाता पुरस्कार विजेती सायकलपटू दिपाली निकम व शिवछत्रपती पुरस्कारार्थी सायकलपटू मीनाक्षी चौधरी, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सचिव नंदू सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरी गटाने सामन्यांची सुरुवात करण्यात आली. उदघाटनाच्या सामन्यात पहिल्या फेरीत ठाण्याच्या प्रेमकुमार मिश्राने पुण्याच्या झाहीर शेखवर तीन सेटमध्ये २५-४, ०-२५ व २२-९ असे पराभूत केले.

पुरुष एकेरी पहिल्या फेरीचे निकाल

  • प्रशांत तिखे (रायगड) वि वि संतोष निमकर (पुणे) १५-१४, १९-१२
  • विनोद बारिया (मुंबई) वि वि प्रशांत गायकवाड (पुणे) २२-६, २५-५
  • रहीम शेख (पुणे) वि वि फिरोझ मुल्ला (मुंबई) २५-६, २५-१
  • सौरभ महाडिक (मुंबई) वि वि शैलेश ढवळे (पुणे) २५-२, २५-९
  • महेंद्र वाघ (मुंबई) वि वि जयदीप चव्हाण (पुणे) १९-१४, २५-१
  • रुपेश मोहोळ (पुणे) वि वि हितेंद्र पटेल (२४-५, २३-१४)
  • दीपक मोरे (पुणे) वि वि मनीष श्रीमंगले (औरंगाबाद) १५-५, २५-७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *