मुंबई :
मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर यांच्या सहयोगाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या ५८ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष सांघिक विभागात दोन गटात एकंदर आलेल्या १२ संघांची विभागणी करण्यात आली होती. अग्रमानांकन दिलेल्या मुंबईच्या संघाने साखळी गटातील आपले पाचही सामने जिंकून १० गुण मिळविले. या गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ठाण्याच्या संघाने ८ गुण मिळविले.
दुसऱ्या गटात द्वितीय मानांकन प्राप्त केलेल्या पुण्याच्या संघानेही आपले पाचही सामने जिंकत १० गुण प्राप्त केले. तर मुंबई उपनगरचा संघ ८ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. अनुक्रमे मुंबई आणि मुंबई उपनगर व पुणे आणि ठाण्याच्या संघात उपांत्य फेरीचे लढत खेळविण्यात येईल.
तत्पूर्वी सकाळी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादरचे उपाध्यक्ष विनय सावंत यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. याप्रसंगी इन्स्टिट्यूटचे सचिव चेतन सावल, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रदीप भाटकर, यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, योगेश फणसळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुष वयस्कर ५० वर्षांवरील सामन्यांचे निकाल
- प्रदीप चुनेकर (ठाणे) वि वि प्रकाश चव्हाण (मुंबई उपनगर) २५-९, २५-२१
- यतिन ठाकूर (मुंबई) वि वि रवी श्रीगडी (पुणे) २५-८, ७-२५, १७-१५
- निरंजन चारी (पालघर) वि वि अष्टक गायकवाड (मुंबई) १७-१२, २५-४
- शब्बीर खान (मुंबई उपनगर) वि वि राजेश हडकर (ठाणे) १८-२५, २५-१९, २५-१७
- सत्यनारायण दोंतुल (मुंबई) वि वि श्रीधर वाघमारे (रायगड) २५-१, २५-१४
- संतोष जोगळेकर (रत्नागिरी l) वि वि अनिस शेख (पुणे) १७-९, २१-८
- सुनील वाघ (पुणे) वि वि संदेश मांजलकर (पालघर) २५-१७, २५-०
- अब्दुल सत्तार शेख (ठाणे) वि वि विवेक देसाई (रत्नागिरी) ८-२५, १५-१३, २५-१६