मुंबई :
छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने देशभरात महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांविरोधात मंत्रालय शेजारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ काळया फिती लावून मुक निदर्शने करण्यात आली.
समाजात वावरताना महिलांना असुरक्षितता वाटणार नाही ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.तसेच आपल्या आजूबाजूला महिला अत्याचाराच्या काही घटना घडत असतील तर त्याविरोधात आवाज उठवू अशी शपथ यावेळी देण्यात आली.
सरकारने ह्या सगळ्या घटनांकडे गंभीरतेने लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी छात्रभारती राज्याध्यक्ष रोहित ढाले, राज्य संघटक सचिन बनसोडे, कार्यकारणी सदस्य लोकेश लाटे, मुंबई अध्यक्ष विकास पटेकर, कार्याध्यक्ष निकेत वाळके, उपाध्यक्ष दीप्ती शेलार, लेसली डिसुझा, सचिव चेतन पाटील, संघटक भावांजी कांबळे, सह कार्याध्यक्ष वैभव गाडेकर, विशाल कदम, राज जगताप, मोहन गायकवाड, निलेश झेंडे, सागर सोनवणे, कल्याणी, दिलीप उपस्थित होते.