अवघ्या महाराष्ट्रातील चिंतामणी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता गणेश टॉकीज, चिंचपोकळी येथून होणार. यावर्षी चिंतामणी कोणत्या रूपात आपल्या भक्तांना दर्शन देणार आहे याची उत्सुकता तमाम चिंतामणी भक्तांना लागून राहिली आहे.या वर्षी देखील चिंतामणीची मूर्ती स्टुडिओ विजय खातू, मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या संकल्पनेतून बकरी अड्डा येथे साकार होत आहे.
दार वर्षी लाखो भाविकांसह ढोल ताशा पथक वंदन करत असतात. यंदा या आगमन सोहळ्यात कलेश्वरनाथ,सोनू मोनू बिट्स, कामतघर -खोणी ब्रास बॅण्ड, भिवंडी गांव,जोगेश्वरी बिट्स,सातरस्ता बिट्स, श्रीगणेशनाद वाद्य पथक पुणे, यांचे वादन होणार असून, सुरूवातीस “प्रो गोविंदा विजेते” जय जवान गोविंदा पथक मानवी थरांची सलामी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी चिंतामणी भक्तांनी शक्यतो वाहने आणू नयेत तसेच स्वयंशिस्त पाळून पोलिसांनी दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव श्री वासुदेव सावंत यांनी केले आहे.