मुंबई :
प्रगत वैद्यकीय उपचारामुळे एका उल्लेखनीय प्रकरणात ९६ वर्षीय बाबूलाल कडाकिया यांच्यावर ऑप्टिक नर्व्हचा आकार आक्रसणारा पिट्यूटरी ट्यूमर काढून टाकण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि शेवटी संबंधित रुग्णाला गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली. रुग्णाच्या वाढलेल्या वयामुळे किंवा वृद्धावस्थेमुळे आणि रुग्णाला आधीपासूनच भेडसावत असलेल्या कार्डिओव्हस्क्यूलर कंडीशन्समुळे वोकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल येथे डॉ. माजदा तुरेल यांनी केलेली ही शस्त्रक्रिया विशेष गुंतागुंतीची होती.
बाबूलाल कडाकिया यांनी आपल्या डोळ्यांची दृष्टी किंवा नजर कमी झाल्याने वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे दाखल होण्याच्या आधी बऱ्याचवेळा वैद्यकीय मदत घेतली होती. परंतु, त्या मदतीचा फायदा होण्याऐवजी जसे जसे दिवस जात होते तशी तशी त्यांची दृष्टी किंवा नजर बिघडतच चालली होती. अशा परिस्थितीत रुग्णाच्या लक्षणांच्या तीव्रतेमुळे या आजारामागचे मूळ किंवा नेमके कारण ओळखण्यासाठी सखोल तपासणी करणे आवश्यक होते.
सुरुवातीला रुग्णाच्या डोळ्यांची तपासणी केली असता एमआरआय स्कॅन करणे आवश्यक असल्याचे समजले. ही तपासणी केल्यानंतर त्यात असे दिसून आले की, बाबूलाल कडाकिया यांच्या ऑप्टिक नर्व्हवर पिट्यूटरी ट्यूमर असल्याने त्यांना दृष्टीदोषाचा त्रास होत होता. बाबूलाल कडकीया यांचा दृष्टीदोषाचा त्रास त्यांनी याआधी इतरत्र केलेल्या तपासणीतून म्हटले गेल्याप्रमाणे सामान्य समस्येशी संबंधित नसून मेंदूच्या गंभीर स्थितीमुळे निर्माण झाल्याचे आता केलेल्या एमआरआय स्कॅनमधून स्पष्ट झाले.
संबंधित रुग्णाला हृदयविकाराच्या त्रासाचा इतिहास असून यामध्ये पूर्वी बसवलेल्या दोन स्टेंटचा समावेश होता. याशिवाय रुग्णाला रक्त पातळ करणारे औषध सुरू होते, पण यामुळे शस्त्रक्रियेच्या नियोजनात गुंतागुंत वाढली.
मणका आणि मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. माजदा तुरेल यांनी बाबूलाल कडाकिया यांच्यासारख्या वयाच्या रूग्णावर शस्त्रक्रिया करण्याचे धोके आणि फायदे यांचे सूक्ष्म मूल्यांकन केले. कडाकिया यांना ऍनेस्थेसिया, अती दक्षता विभागात अधिक काळ मुक्काम करावा लागणे आणि संभाव्य संक्रमणाशी संबंधित अधिकाधिक जोखमींचा सामना करावा लागू शकतो, असेही दिसून आले. रुग्णाची आधीपासूनच अस्तित्वात असलेली हृदयाची नाजूक स्थिती आणि रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या वापरामुळे शस्त्रक्रिया करण्यात इतरही अनेक आव्हाने होती.
डॉ. तुरेल यांनी सांगितले की, “बाबूलाल कडाकिया यांचे वाढलेले वय आणि त्यांची हृदयविकाराची स्थिती पाहता, शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वरवरचा विचार करून घेतलेला नव्हता. तथापि, दृष्टी किंवा नजर कमी होणे आणि ऑप्टिक नर्व्हवरील दाब कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक झाले.”
विशेष म्हणजे, बाबूलाल कडाकिया यांच्यावरील ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि डॉ. तुरेल यांनी संपूर्ण ट्यूमर काढून टाकला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर बरा झाल्याने बाबूलाल कडाकीया यांना चांगल्या स्थितीत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
बाबूलाल कडाकिया यांच्या या प्रकरणातून अचूक रोगनिदानाचे महत्त्व अधोरेखित होते. कारण पिट्यूटरी ट्यूमर म्हणजेच मोतीबिंदू असल्याचे एक सोपे निदान बऱ्याचदा केले जाऊ शकते आणि म्हणूनच ते चुकू शकते. दृष्टीदोषाच्या समस्येवर उपाययोजना करताना मेंदूशी संबंधित समस्यांची तज्ज्ञांनी कसून तपासणी करणे गरजेचे असल्याचे या यशस्वी उपचाराने अधोरेखित केले आहे. आता ट्यूमर पुन्हा उद्भवणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि कार्डीओव्हस्क्यूलरशी संबंधित आरोग्य व्यवस्थापित करण्यासाठी बाबूलाल कडाकिया यांचे शस्त्रक्रियेनंतर निरीक्षण करणे सुरूच राहणार आहे.
बाबूलाल कडाकीया यांचे हे प्रकरण सुयोग्य रोगनिदान आणि सर्वसमावेशक उपचार नियोजनाची रुग्णाला रोगमुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे उदाहरण आहे. गुंतागुंतीची वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या वयोवृद्ध रूग्णांनादेखील शस्त्रक्रियेचा फायदा होऊ शकतो, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. बाबूलाल कडाकिया यांच्यावर केलेल्या उपाचारातली सहयोगी प्रक्रिया रुग्णांच्या सेवेसाठी सखोल, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे दाखवून देते.