क्रीडा

रोटरी क्लब रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे उदघाट्न

रोटरी भवन, डोंबिवली पूर्व येथे आज पुरुष एकेरी गटाने सुरु झालेल्या रोटरी क्लब रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे उदघाट्न रोटरी क्लब ऑफ ठाण्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसांगी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष माधव सिंग, सचिव चक्रपानी शुक्ला, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन खजिनदार प्रसाद शेंबेकर उपस्थित होते.

पुरुष एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत पालघरच्या नितेश बाबारियाने मुंबईच्या बाळासाहेब कनुकलेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-१९, १६-२ व १८-९ असे पराभव केले. तर मुंबईच्या ओजस जाधवने मुंबईच्याच संदीप जोगळेवर ११-९, १६-१ अशी मात करत आगेकूच केली.

पुरुष एकेरी दुसऱ्या फेरीचे निकाल

  • अभिजित त्रिपनकर  (पुणे) वि वि संदेश वरगडे (मुंबई उपनगर) २५-१०, २५-११
  • जितेश कदम (मुंबई उपनगर) शंकर सावर्डेकर (मुंबई) २५-१, २५-६
  • गौरव हुदळे (कोल्हापूर) वि वि सुपेश कामतेकर (मुंबई) १७-१५, १४-१९, १३-१०
  • ओंकार नेटके (मुंबई) वि वि सीराम चक्का (मुंबई उपनगर) ४-२५, २२-११, २५-५
  • राहुल सोळंकी (मुंबई) वि वि भारत मकवाना (ठाणे)  २५-०, १७-४
  • संदीप दिवे (मुंबई उपनगर) वि वि शिरीष मुदगल (मुंबई) २५-१८, २५-८
  • शोएब पटेल (मुंबई उपनगर) वि वि राजेश रिकामे (मुंबई) १७-४, ८-२१, १८-५
  • सचिन पवार (पालघर) वि वि महेश सांडीस (मुंबई) २१-४, ४-१९, १६-११
  • जावेद  सय्यद (मुंबई उपनगर) वि वि निलांश चिपळूणकर (मुंबई) ११-९, ११-१७, १७-१२

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *