शहर

मलबारहिल मतदारसंघात कामांची जंत्री विरोधात भावनिक राजकारण

मुंबई : 

उच्च्रभू लोकवस्ती, सनदी अधिकाऱ्यांसह अनेक उद्योगपती वास्तव्यास असलेला मलबार हिल विधानसभा मतदारसंघाकडे उभ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहेे. महायुतीकडून तब्बल सहा टर्म आमदार राहिलेले आणि महायुती सरकारमध्ये अनेक मंत्री पद भू्षविलेले मंगलप्रभात लोढा यांन सहाव्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पाडण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भावनिकतेचा मुद्दा पुढे करीत पहिल्यांदाच नवख्या उमेदवार भेरुलाल चौधरी यांना संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात नवा विक्रम प्रस्थापित होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महायुतीकडून या मतदारसंघासाठी मंगलप्रभात लोढा यांचे पहिल्याच उमेदवार यादीत नाव जाहीर करुन प्रचारात आघाडी घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. लोढा यांचा आतापर्यंतचा प्रचाराचा कार्यक्रम लक्षात घेतला तर मंगलप्रभात लोढा यांनी मतदारसंघातील घरोघरी जाऊन प्रचार करण्यास अधिक प्राधान्य देत मतदारसंघ पिंजून काढला आहे. याशिवाय मतदारसंघातील त्यांचा जनसंपर्क लक्षात घेता स्थानिक मंडळांसोबत केलेल्या बैठका, इमारत प्रमुखांची बैठक याशिवाय युवा वर्गांशी संवाद साधत या मतदारसंघासाठी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्याशिवाय मंगलप्रभात लोढा यांनी मतदारसंघात केेलेल्या विकासकामांची यादीच मतदांना आर्कषित करीत असल्याची माहिती मतदारांकडून देण्यात आली आहे. यातच मंगलप्रभात लोढा यांनी या मतदारसंघातील बाणगंगा तलावाच्या पुर्नंबांधणीसाठी केलेले प्रयत्न असो किंवा हँगिग गार्डनच्या जलाशयासाठी संरक्षणासाठी दिलेला लढ्यामुळे स्थानिक मतदारांपर्यंत पोहचणे अधिक शक्य झाल्याची चर्चा या मतदारसंघात रंगू लागली आहे.

याशिवाय मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास मंत्री केलेल्या कामांबराेबरच जनता दरबारच्या माध्यमातून सामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न आज त्यांंच्या प्रचाराचा प्रमुख आर्कषण ठरत आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील सर्व आयटीआयमध्येे त्यांनी संविधान मंदिराच्या केलेल्या उभारणीचा त्यांना सर्व समाजचा पाठिंबा मिळत असल्याचे मतदारसंघात फेरफटका मारताना दिसत आहे. त्यामुळेे अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि मनमिळाऊ स्वभावाच्या जोरावर मंगलप्रभात लोढा पुन्हा विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडतात का? हे पाहून घेणे उत्सुकतेेचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून म्हणजेच शिवसेना उबाठाकडून भावनिकता आणि धार्मिक कार्ड चालविण्याची प्रयत्न केला आहे. शिवसेना उबाठाकडून पहिल्यांदाच भेरुलाल चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून सॉलिसिटर म्हणून काम करणाऱ्या चौधरी यांना जैन समाजात असलेला जनसंपर्क लक्षात घेता धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मतदारसंघासाठी चौधरी नवे असल्याने त्यांना प्रचारात दमछाक होत आहे. त्याशिवाय या मतदारसंघातील मराठी मते त्यांच्या पारड्यात पडतील का? हा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याने येत्या काळात याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *