मुंबई :
विधानसभा निवडणूकीचे काम असणाऱ्या शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक नेते व भाजपाचे राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० तारखेला होणार आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या असून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुकीचे कामकाज अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे असल्याने संबंधित कर्मचारी हे मानसिक तणावाखाली असतात. निवडणूक साहित्य व मतदान यंत्रे ताब्यात घेण्याकरिता १९ तारखेला सकाळी ८ वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. हे साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रात जाऊन तेथे मतदान केंद्राची उभारणी, आवश्यक ते नियोजन करावे लागणार आहे. त्या दिवशी तेथेच मुक्काम करून २० तारखेला पहाटे ५ वाजता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कर्तव्यासाठी उपस्थित रहावे लागणार आहे. २० तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे व मतदान यंत्रे जमा करेपर्यंत संबंधितांना नेमून दिलेले ठिकाण सोडता येत नाही. त्यामुळे हे सर्व कामकाज सुमारे ४० ते ४५ तास सलग कामकाज करावे लागणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना घरी जायला रात्रीचे २ वाजतात. त्यामुळे सकाळी शाळेत जाणे अशक्य असल्याने २१ तारखेचा दिवस निवडणूक कर्तव्यार्थ समजून शिक्षकांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी शिक्षक नेते व भाजपाचे राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० तारखेला होणार आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या असून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणुकीचे कामकाज अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे असल्याने संबंधित कर्मचारी हे मानसिक तणावाखाली असतात. त्यांचा हा ताण कमी करण्यासाठी ही मागणी करत असल्याचे शिक्षक नेते व भाजपाचे राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी सांगितले.