आरोग्य

दोन वर्षापासून अन्नही गिळता येईना; अखेर निघाला दुर्मीळ विकार

परेलच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये ६१ वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार

मुंबई :

अचलसिया कार्डिया हा एक अत्यंत दुर्मिळ आजार असून यामुळे अन्न नीट गिळता येत नाही. अचलसिया कार्डियामध्ये अन्ननलिका पोटातून अन्न आणि द्रव वाहून नेण्यास सक्षम नसते. या आजारात पोटाच्या खालच्या भागातून अन्ननलिकेच कार्य बंद पडते. या आजाराने ग्रासलेल्या ६१ वर्षीय व्यक्तीवर परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटल येथे यशस्वी उपचार करण्यात आले. संचालक आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मेगराज इंगळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अचलेशिया या दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या विकाराने ग्रस्त रुग्णावर यशस्वी उपचार केले. गेल्या दोन वर्षांपासून अन्न गिळण्यास त्रास होणाऱ्या या रुग्णाला अखेर आराम मिळाला असून आता या रुग्णाचा त्रास कमी झाला आहे.

मुंबईतील रुग्ण सुहास आर. मुनगाकर यांना खाताना उचकी लागत असल्याची समस्या उद्भवली. एक किरकोळ समस्या समजून त्यांनी याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. मात्र हळूहळू हा त्रास आणखी वाढून घशात अन्न अडकल्याची भावना निर्माण झाली. हा त्रास कमी करण्यासाठी रुग्णाने पाणी पिऊन थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा खाण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी ही समस्या कमी झाल्यासारखी वाटली. मात्र नंतर त्याला जेवणानंतर छातीत जळजळ होऊ लागली, विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत हा त्रास वाढला. अस्वस्थता दूर करण्यासाठी त्याने अँटासिड्स आणि इतर औषधे घेणे सुरू केले. त्यांच्या पत्नीने फॅमिली डॉक्टरांशी चर्चा केली व या समस्येबद्दल माहिती दिली, त्यानंतर पुढील मूल्यमापनासाठी रुग्णाला डॉ. मेगराज इंगळे यांचा सल्ला घेण्यास सांगितले.

डॉ मेगराज इंगळे (संचालक आणि वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीस्ट) सांगतात की, रुग्णाला अन्न गिळण्यात अडचणी येत होत्या, तसेच छातीत दुखत होते. एंडोस्कोपीमध्ये अन्ननलिकेमध्ये तीन-चार ब्लॉकेज असल्याचे समोर आले. पोटाजवळची अन्ननलिका अरुंद झाली होती. प्रत्येक वेळी रुग्ण जेवला की अन्न त्याच्या घशात अडकत असे. नंतर पाणी पिऊनही फरक पडत नव्हता. त्याला अनेकदा उलट्या होऊन खाल्लेले अन्न पुन्हा बाहेर यायचे. एन्डोस्कोपीमध्ये अन्न-नलिकेच्या खालच्या टोकाचा अरुंदपणा दर्शविला ज्याला “बर्ड बीक” म्हणून ओळखले जाते एक लाख लोकसंख्येमागे एका व्यक्तीमध्ये अचलसिया कार्डिया विकार आढळतो. आम्ही दरवर्षी जवळजवळ १० ते २० रुग्णांवर उपचार करतो ज्यांना कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.

डॉ इंगळे पुढे सांगतात की, रुग्णावर ओरल एन्डोस्कोपिक मायोटोमी (पीओईएम) प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. प्रक्रियेची सुरुवात ही संपूर्णत: एन्डोस्कोपिक पद्धतीने केली जाते. यामध्ये अन्ननलिकेच्या स्नायूवर एक छेद देऊन उद्भवणारी समस्या काढून सर्वसाधारणपणे गिळण्याची प्रक्रिया तयार केली जाते. ही कमी जखम करणारी आणि वेगाने बरी होणारी प्रक्रिया आहे. यामध्ये रुग्ण लवकर बरा होतो, ज्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज मिळाला त्यादिवशीच तो अन्न गिळू शकत होता.

दोन वर्षांपूर्वी मला जेवताना सतत उचकी यायची हे माझ्यासाठी अगदी त्रासदायक होते. मला अन्न गिळणे अत्यंत कठीण झाले कारण मला अचलसिया यादुर्मिळ विकाराचे निदान झाले वेळीच निदान केल्याने मी डॉ मेगराज इंगळे आणि त्यांच्या टीमचा सदैव ऋणी आहे. मी आता माझे आवडते पदार्थ कोणत्याही अडचणींशिवाय खाऊ शकतो अशी प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.

ग्लेनईगल्स हॉस्पिटल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत निदान साधनांनी दुर्मिळ अशा गिळण्याच्या विकारांना अचूक आणि काळजीपूर्वकरित्या हाताळण्यात आले. अत्याधुनिक उपकरणे, तज्ज्ञांची टीम रुग्णांमधील या गुंतागुंतीच्या परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे. या ठिकाणी रुग्णांना नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपचार मिळतील याची खात्री दिली जाते.
– डॉ बिपिन चेवले, सीईओ, ग्लेनईगल्स हॉस्पिटल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *