आरोग्य

आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि कॉक्लियर इम्प्लांट झालेल्या रुग्णांना सांताक्लॅाजने दिल्या भेटवस्तू

मुंबई :

दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. विशेष म्हणजे या दिवशी मुलं भेटवस्तू मिळण्याची वाट पाहत असतात. यानिमित्त लीलावती रूग्णालयाने ग्रामीण आश्रमशाळांमधील मुलांसाठी आणि कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केलेल्या मुलांसाठी ख्रिसमस उत्सवाचे आयोजन केले. यामध्ये ३०० हून अधिक मुले आणि सुमारे १०० कॉक्लियर इम्प्लांट झालेले रुग्ण सहभागी झाले होते. यामध्ये नृत्याविष्कार सादर करत, सहभागी मुलांना आकर्षक भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रसंगी चारू मेहता (संस्थापक स्थायी विश्वस्त), राजीव मेहता ( स्थायी विश्वस्त), प्रशांत मेहता (स्थायी विश्वस्त) आणि डॉ. निरज उत्तमानी (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी मुलांना शुभाशिर्वाद दिले आणि मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आश्रमशाळांतील ३०० हून अधिक विद्यार्थी पहिल्यांदाच मुंबईला आले होते. गजबजलेले शहर आणि उंचच उंच इमारती पाहून या मुलांना कुतूहल वाटले. मागील वर्षांप्रमाणेच यंदाही हॉस्पिटलने मुलांसाठी जादुचे प्रयोग, नृत्याविष्कार आणि फोटोग्राफीचे सत्र त्याचबरोबर भव्य ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. याठिकाणी सांताक्लॉजने विशेष हजेरी लावली होती आणि उपस्थित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवला. प्रशांत मेहता (स्थायी विश्वस्त, लीलावती हॉस्पिटल) अधोरेखित करतात की या नाताळचा उत्सव या मुलांमधील आनंद द्विगुणीत करते. लीलावती हॉस्पिटलमध्ये आम्ही आरोग्यसेवेच्या पलीकडे प्रत्येक मुलाला आधार, प्रेम आणि आपुलकीची भावना व्यक्त करत त्यांचे जीवन आणखी सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देतो आणि जीवनातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करतो.

राजीव मेहता (लीलावती रुग्णालयाचे स्थायी विश्वस्त) सांगतात की, लीलावती रुग्णालयाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित सर्वच स्तरांतील व्यक्तींकरिता असे विविध उपक्रम राबविले जातात. असंख्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. प्रत्येक मुलाला समान संधी मिळायला हवी आणि ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशा उपक्रमांची रचना ही प्रत्येकासाठी उत्तम भविष्यासाठी तयार करण्यासाठी केल्याची माहिती मोहित माथूर (स्थायी विश्वस्त, लीलावती रुग्णालय, वांद्रे) यांनी दिली.

ग्रामीण आश्रमशाळांमधील मुलांचे याठिकाणी स्वागत करुन आम्हाला खुप आनंद झाला, त्यांनी मुंबईला पहिल्यांदाच भेट दिली. गरजू व्यक्तींच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलणारे उपक्रम सुरू करण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्नशील आहोत अशी प्रतिक्रिया डॉ निरज उत्तमानी (लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वांद्रे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *