आरोग्य

भारतात दरवर्षी २ लाख नवीन रुग्ण यकृत आजाराचे आढळतात

नवी मुंबई :

अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये नवे, १२ बेड्सचे लिव्हर इंटेन्सिव्ह केयर युनिट (ICU) सुरु करण्यात आले आहे. ऍक्यूट लिव्हर फेल्युअर, जुनाट आजारांवर उपचार आणि ट्रान्सप्लान्ट रिकव्हरीसाठी सर्वसमावेशक देखभाल याठिकाणी प्रदान केली जाईल. नवी मुंबई भागात ही अशाप्रकारची पहिलीच सुविधा आहे.

भारतामध्ये यकृताचे आजार ही खूप मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. २०१५ मध्ये यकृताच्या आजारांमुळे संपूर्ण जगभरात झालेल्या एकूण २ मिलियन मृत्यूंपैकी १८.३% मृत्यू एकट्या भारतात झाले. क्रोनिक लिव्हर आजार (CLD) हा खूप जास्त मद्यपान, व्हायरल हेपेटायटिस (HBV-HCV), नॉन-अल्कहोल फॅटी लिव्हर आजार (NAFLD) आणि आनुवंशिक आजारांमुळे होतो. भारतामध्ये ४० मिलियनपेक्षा जास्त लोकांना हेपेटायटिस बीचा संसर्ग झालेला आहे. दरवर्षी जवळपास ६ लाख लोक यामुळेच आपला जीव गमावतात. क्रोनिक हेपेटायटिस सी लिव्हर कॅन्सरच्या ३२% आणि सिरॉसिसच्या २०% केसेसचे कारण असतो, तरीही बहुतांश लोकांना आपल्याला संसर्ग झाला आहे हेच माहिती नसते. हेपेटायटिस ई व्हायरस (HEV) हा तीव्र हेपेटायटिसच्या १० ते ४०% केसेसचे कारण असतो आणि गर्भवती महिलांमध्ये याचा मृत्युदर खूप जास्त असतो. एकूण लोकसंख्येपैकी ९ ते ३२% लोक NAFLD ने प्रभावित असतात आणि यकृताच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे हे एक प्रमुख कारण आहे. व्हायरल संसर्ग आणि औषधांच्या टॉक्सिसिटीमुळे होणारे ऍक्यूट लिव्हर फेल्युअर (ALF) वयस्कर लोकांमध्ये हेपेटायटिस ई (२३-५६.५%) आणि मुलांमध्ये हेपेटायटिस ए (१०-७१%) मुळे होतो. शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या यकृताच्या आजाराच्या २ लाख नवीन केसेस भारतात दरवर्षी आढळून येतात. दरवर्षी २५ हजार ट्रान्सप्लांट्स करण्याची गरज असते. यकृताच्या आजारांचे ओझे सातत्याने वाढत जात आहे. योग्य वेळी, लवकरात लवकर आजार समजून येणे आणि प्रगत देखभालीपर्यंत पोहोच वाढवणे खूप जास्त निकडीचे आहे.

अमेय सोनावणे, गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि हेपेटोलॉजी कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”भारतामध्ये यकृताचे आजार हे आरोग्यासाठी खूप मोठे आव्हान बनले आहे. दर ५ पैकी १ वयस्कर व्यक्तीमध्ये यकृतसंबंधी आजारांची लक्षणे दिसून येतात. अयोग्य आहार, खूप जास्त प्रमाणात मद्यपान, बैठी जीवनशैली, विषाणू संसर्ग आणि काही आनुवंशिक कारणांमुळे फॅटी लिव्हर आजार, हेपेटायटिस आणि सिरॉसिससहित इतर आरोग्य समस्या उद्भवतात. अनुमान आहे की, यकृताच्या आजारांसाठी विशेष देखभालीची मागणी खूप जास्त वाढेल.”

डॉ गुरुप्रसाद शेट्टी, लीड-एचपीबी आणि लिव्हर ट्रान्सप्लान्टेशन सर्जरी,अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी सांगितले,”भारतामध्ये यकृताच्या आजाराचे ओझे वाढत असल्यामुळे विशेष देखभाल खूप गरजेची आहे आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी डेडिकेटेड लिव्हर आयसीयूची सुरुवात हे महत्त्वाचे पाऊल आम्ही उचलले आहे. किडनी निकामी झाल्यास डायलिसिस करता येते पण अशी कोणतीच मशीन नाही जी यकृत निकामी झाल्यास त्याचे काम करू शकेल, त्यामुळे यकृताच्या आजारामध्ये प्रगत देखभालीची मागणी नजीकच्या भविष्यकाळात खूप जास्त वाढत जाईल. आमच्या तज्ञांची टीम या रुग्णांची देखभाल करण्यासाठी प्रशिक्षित आहे. आमच्या सेंटरमध्ये एक यशस्वी ट्रान्सप्लान्ट प्रोग्राम देखील आहे ज्याचा सफलता दर ९०% आहे आणि २१५ पेक्षा जास्त लिव्हर ट्रान्सप्लांट्स करण्यात आले आहेत.”

डॉ अक्षय चल्लानी, लीड-सिनियर कन्सल्टन्ट क्रिटिकल केयर-मेडिकल ऍडवाईजर,अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,”यकृताचा आजार वाढल्यास इतर अनेक अवयवांच्या कामात अडथळे येतात, किडनी, हृदय, फुफ्फुसे आणि ब्रेनवर एकाच वेळी परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे अतिशय गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होऊन बसते. जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचावा आणि शरीराचे कोणतेही परतवता येणार नाही असे नुकसान होण्यापासून रोखले जावे यासाठी मल्टी-डिसिप्लिनरी दृष्टिकोन आवश्यक आहे. म्हणूनच अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने एक डेडिकेटेड लिव्हर आयसीयू सुरु केला आहे, याठिकाणी एक सुसंगत मल्टी-डिसिप्लिनरी दृष्टिकोन निश्चित केला जाईल, गुंतागुंत कमी होईल आणि यकृताचा आजार खूप जास्त वाढलेल्या रुग्णांचा जिवंत राहण्याचा दर वाढेल, दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले करण्यासाठी वेळीच उपचार प्रदान केले जातील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *