
मुंबई :
महिलांच्या सक्षमीकरणासाठी, मुलींपासून वृद्ध महिलांच्या काळजीसाठी व महिलांवरील हिंसाचाराविरोधात एकत्र येण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई गर्भवती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संस्थेने (MOGS) वॉकेथॉनचे आयोजन केले होते. ‘नारी एक संपूर्ण शक्ती’ या थीमवर आधारित या वॉकेथॉनमध्ये महिलांच्या १०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्तिमान प्रस्थापित करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.
मुंबई गर्भवती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये मुंबईतील सुमारे १०० पेक्षा अधिक सदस्यांनी भाग घेतला हाेता. वॉकेथॉनसाठी डॉ. शांताकुमारी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबरच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये डॉ. सुनीता तेंडुलवाडकर, डॉ. सुवर्णा खाडिलकर आणि डॉ. हृषिकेश पै हे सहभागी झाले होते. त्यांनी उपस्थित डॉक्टर व प्रेक्षकांसमोर अमूल्य माहिती भंडार खुले करत त्यांना मार्गदर्शन केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, मुलींपासून वृद्ध महिलांच्या काळजीसाठी व महिलांवरील हिंसाचाराविरोधात एकत्र येण्यासाठी यावेळी उपस्थितांनी एल्गार केला.
या कार्यक्रमात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्तिमान असलेल्या अनेक यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पद्मविभूषण मिस मेरी कॉम, डॉ. साधना देसाई, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि डॉ. मंदाकिनी मेघ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांच्या अपूर्व योगदानाचा गौरव करण्यात आला. ‘नारी एक संपूर्ण शक्ती’ या थीमवर आधारित या वॉकेथॉनमध्ये महिलांच्या १०० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.