क्रीडा

५७ वी पुरुष व महिला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर

मुंबई :

जगन्नाथ पुरी (ओडिशा) येथे ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ५७ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ मोठ्या उत्साहात रवाना झाले असून या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून पुरुष आणि महिला गटातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यानंतर सांगली येथे आयोजित सराव शिबिरानंतर या दोन्ही संघांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी पूर्ण केली. नुकतेच महाराष्ट्र संघ जगन्नाथ पुरीकडे रवाना झाला असून, राज्यभरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संघास शुभेच्छांचा वर्षाव

संघाच्या निरोपप्रसंगी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांच्यासह राज्य असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. “महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार आणि सुवर्णमय कामगिरी करेल,” असा विश्वास डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे संघ

पुरुष गट : लक्ष्मण गवस (कर्णधार, ठाणे), प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, रूद्र थोपटे, रविकिरण कच्छवा, शुभम थोरात (सर्व पुणे), ऋषिकेश मुर्चावडे, अनिकेत चेदवणकर, निहार दुबळे (मुंबई उपनगर), विजय शिंदे, श्याम ढोबळे (धाराशिव), मिलिंद चावरेकर, अक्षय मासाळ (सांगली), पियुष घोलम (मुंबई), नरेंद्र कातकडे (अहिल्यानगर). प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : डॉ. पवन पाटील (परभणी), व्यवस्थापक : रमेश लव्हाट (अहिल्यानगर).

महिला संघ : अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रीती काळे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले (धाराशिव), सानिका चाफे, रितिका मगदूम, प्रगती कर्नाळे (सांगली), प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, ऋतिका राठोड (पुणे), पायल पवार (रत्नागिरी), मनिषा पडेल (नाशिक), रेश्मा राठोड (ठाणे). प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : अनिल रौंदाळ (नंदुरबार), व्यवस्थापक : संध्या लव्हाट (अहिल्यानगर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *