आरोग्य

जे जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई :

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी प्रथमच यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामुळे जे.जे. रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांचा याचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर पहिल्याच दिवशी आणखी दोन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या. यामध्ये एक हर्नियावरील फंडोप्लिकेशन तर इनगुइनल हर्निया प्रकरणांवरील दोन शस्त्रक्रियांचा समावेश असून, यामध्ये डॉ. गिरीश डी. बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. वकार अन्सारी, डॉ. कविता जाधव, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे यांचा समावेश होता. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना चेन्नईमधील अपोलो रुग्णालयातील रोबोटिक सर्जन डॉ. सुदीप्तो कुमार स्वेन यांनी मार्गदर्शन केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सचिव धीरज कुमार, आयुक्त राजीव निवतकर, आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची दूरदृष्टी व सक्रिय प्रयत्नांमुळे जे.जे. रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भांडारवार यांनी दिली.

दुर्बल घटातील रुग्णांना होणार लाभ

जे.जे. रुग्णालयात रोबोटिक सर्जरी सुरू झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर होणारी गुंतागुंत टळता येणार आहे. रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होणार आहे. जे.जे. रुग्णालयातील आधुनिक वैद्यकीय सेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांचा याचा अधिकाधिक लाभ होणार आहे.

डॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण

जे.जे. रुग्णालयामध्ये रोबोट आणल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर, तंत्रज्ञ व परिचारिका या प्रशिक्षित काही महिने प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी रुग्णाालयामध्ये सिम्युलेटरचा वापर करण्यात आला. रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये स्वतंत्र शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले आहे. प्रचलित पद्धतीने शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना रुग्णांच्या चारही बाजूने फिरणे शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र रोबोटमध्ये असलेल्या कॅमऱ्यामुळे शस्त्रक्रिया करताना मानवाच्या शरीरातील प्रत्येक भाग अधिक सूक्ष्मपणे दाखवला जातो. तसेच यंत्रमानवाच्या हाताला असलेला प्रोब हा ३६० अंशामध्ये फिरत असल्याने डॉक्टरांना यंत्रमानवाच्या मदतीने शस्त्रक्रिया करणे सोपे जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *