शहर

Health Concern:उन्हाळ्यात सकाळची सुरुवात चहा-कॉफीने करताय? थांबा!

उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात अनेकजण आपली दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करत असतात. (Health Concern) मात्र, ही सवय शरीरासाठी घातक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. शरीरात कैफिनयुक्त पेयांचे अति सेवन केल्यास पाण्याची कमतरता, झोपेच्या समस्या, पचन बिघाड आणि मानसिक तणाव या समस्या निर्माण होऊ शकतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, “उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होणे ही सर्वसामान्य समस्या आहे. अशा वेळी चहा किंवा कॉफीमध्ये असणारे कॅफिन डिहायड्रेशन वाढवते.” यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे, अशक्तपणा आणि चिडचिडेपणा यांसारखे परिणाम जाणवू शकतात.

रिकाम्या पोटी चहा-कॉफी म्हणजे पचन बिघडण्याचं आमंत्रण

रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्यास गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या तक्रारी वाढू शकतात. उन्हाळ्यात पचनक्रिया आधीच मंदावलेली असते, त्यात कॅफिनचा अतिरिक्त भार दिल्यास समस्या आणखी गंभीर होऊ शकतात. विशेषतः ज्यांना पचनाच्या समस्या आधीपासून आहेत, त्यांनी या सवयीपासून दूर राहणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीराला अधिक विश्रांतीची गरज असते. मात्र, कॅफिनमुळे झोपेच्या नैसर्गिक चक्रावर विपरित परिणाम होतो. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, त्यामुळे दिवसभर मानसिक थकवा, चिडचिडेपणा आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचणी निर्माण होतात.

Summer health tips l मग काय करावं?

उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात पाणी, लिंबूपाणी, नारळ पाणी, ताक किंवा फळांच्या रसाने करावी. हे पेय शरीरात थंडावा देतात, हायड्रेशन राखतात आणि पचन सुधारतात. विशेषतः लिंबूपाणीमध्ये व्हिटॅमिन C असून, ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं. जर चहा किंवा कॉफी घेणं टाळता येत नसेल, तर ती मर्यादित प्रमाणात आणि जेवणानंतरच घ्यावी. दिवसातून एकदाच घेतल्यास त्रास कमी होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *