क्रीडा

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल 

मुंबई : 

क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि राष्ट्रीय क्रीडा संवर्धन संस्था (NSPO) च्या संयुक्त विद्यमाने, दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रीय स्टेअर्स कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्टेअर्स कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे.

दिल्ली येथे १९ ते २२ मेदरम्यान घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्टेअर्स कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ७० खेळाडूं सहभागी झाले होते. यामध्ये मुंबईतून व्हीजे कोम्बॅटचे पाच खेळाडू होते. त्यात कोच मुक्ताई जाधव व सोनाक्षी थापा यांनी कराटे स्पर्धेत काता व कुमिती प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तसेच कोच नीलम कदम हिने काटा या प्रकारात रौप्य तर कुमिते या प्रकारात सुवर्ण पदक, अलोक अधटराव यांनी काटा व कुमीते या प्रकारात रौप्य पदक, समर्थ पिलंकर व कल्याणी जाधव यांनी काता व कूमिते प्रकारात कांस्य पदक मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी नेत्रदीपक कौशल्य दाखवत सर्वात जास्त सुवर्ण पदक मिळवले. महाराष्ट्राला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पहिले स्थान मिळवून दिले. त्यामुळे देशातील क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मान अजून उंचावली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय सुरक्षा राज्यमंत्री संजय शेठ आणि इंडियन ऑलिम्पिकच्या अध्यक्षा पी.टी. उषा या दोघांनी उपस्थित खेळाडूंना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. या प्रसंगी स्टेअर्सचे संस्थापक सिद्धार्थ उपाध्याय, स्पर्धा प्रमुख परस मिश्रा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या राष्ट्रीय स्पर्धा दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे १९ ते २२ मेदरम्यान पार पडल्या असून, या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राने पहिलं स्थान मिळवले असल्याचं स्टेअर्स कराटे महाराष्ट्र राज्य प्रमुख विशाल जाधव यांनी सांगितले. स्टेअर्स महाराष्ट्र टुर्नांमेंटचे अध्यक्ष राजकपूर बागडी व उपाध्यक्ष गणेश मंगल गिरी व राज्यातील महत्वाच्या जिल्हा प्रमुख त्यांच्याकडून खेळाडूंचे व राज्य प्रमुख यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *