मनोरंजन

सुप्रसिध्द युवा नाट्य निर्माता राहुल भंडारे यांना “फेमस” पुरस्काराने सन्मानित

मुंबई : 

राहुल भंडारे हा नाट्यसृष्टीमध्ये निर्माता म्हणून परिचयाचा आहे. युवा अवस्थेतच नाटकाची निर्मिती करून अधिक प्रसिद्धी मिळवणारा तो बहुदा एकमेव निर्माता असावा. अनेक नाटकांची त्यांनी निर्मित केली आहे. त्याच्या या प्रक्रियेमध्ये नामवंत निर्माते, दिग्दर्शक ही सहभागी झालेले आहेत.

अलीकडे वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर त्याचे फोटो प्रसिद्ध होताना दिसत आहेत. त्याला कारण सुद्धा आहे ते म्हणजे तो “अखिल भारतीय निर्माता संघ” संघामध्ये सक्रिय आहे. निर्मात्यांच्या समस्या तो मंत्र्यांपर्यंत मांडत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. निर्मात म्हणून तो जेवढा परिचयाचा आहे. तेवढाच तो सच्चा कार्यकर्ता म्हणूनही दिसायला लागलेला आहे. त्याच्या कामाची नोंद म्हणून सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतलेली आहे. निर्मिती बरोबरच प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वासाठी नागपूरच्या संस्थेच्या वतीने “फेमस” पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा नाट्यसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीबद्दल प्रयोगशील निर्माता म्हणून त्याचा सन्मान हा नागपूरच्या व्यासपीठावर करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे नागपूरकरांचे आदर्शवत व्यक्तिमत्व असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्याला सन्मानपूर्वक देण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *