मुंबई :
शाळांमध्ये १० वी १२ वीच्या परीक्षा सुरू असताना आता शिक्षकांना मुंबईतील मदरशांचे मॅपिंग करण्याचे काम देण्यात आले आहेत. ही कामे तातडीने स्थगित करण्याची मागणी शिक्षक नेते व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे. अनिल बोरनारे यांनी याबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या पत्राच्या संदर्भानुसार शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांनी १२६ अतिरिक्त शिक्षकांना १८ तारखेपर्यंत मदरशांचे मॅपिंग करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. तथापि शाळांमध्ये १० वी १२ वीचे परीक्षा केंद्र आहेत. अनेक शिक्षकांना बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या कामांवर परिणाम होणार असल्याने तातडीने आपल्या स्तरावरून शिक्षकांना दिलेले काम थांबविण्यात यावे, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.