शहर

खासदार संजय पाटील यांनी घेतली पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती

नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडवा - खा. संजय दिना पाटील

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टी विभागातील विविध नागरी समस्यांबाबत नवनिर्वाचित खासदार संजय पाटील यांनी काल महापालिकेच्या कार्यालयात सायंकाळी भेट देऊन माजी नगरसेवक, स्थानिक नागरिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सहायक आयुक्त अजय पाटणे यांच्यासमवेत चर्चा करून स्थानिक समस्या सोडविल्या. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याबाबत काही सूचना केल्या असून त्याबाबत वारंवार पाहणी करणार असल्याचेही खासदार संजय पाटील यांनी सांगितले. नागरिकांचे काम वेळेवर होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली.

खासदार संजय पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू केलेल्या जनसंपर्क बैठकीमध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांची कर्तव्य तत्परता व सहकार्याची अपेक्षा ठेवली असून, नागरिकांना वारंवार विभाग कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लागू नयेत म्हणून सर्व संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी प्राधान्याने त्यांच्या त्यांच्या नेमून दिलेल्या प्रभागातील नागरी समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत,असे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीने निवडणूकीमध्ये नागरिकांना दिलेल्या वचनबध्दतेची पूर्तता करणेसाठी आपण अहोरात्र मेहनत घेणार असल्याचेही संजय पाटील यानी सांगितले. आपण प्रत्येक प्रभाग निहाय आढावा घेऊन नागरी समस्या तातडीने सोडविणार असल्याचे नमूद करून जे अधिकारी सहकार्य करणार नाहीत, त्यांना शिक्षा करणेस मागे पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. कालच्या जनता दरबारास माजी नगरसेवक, पदाधिकारी, व स्थानिक नागरिकांनी आपापले स्थानिक प्रलंबित प्रश्न व समस्या खासदारांसमोर मांडल्या. त्या त्वरित सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देऊ आणि ते कालबध्द वेळेतच सोडवू असे खासदार संजय पाटील यांनी उपस्थित नागरिकांना वचन दिले. सहाय्यक आयुक्त पाटणे यांनी खासदार महोदय यांनी मांडलेल्या मुद्यांबाबत प्रशासन तातडीने कार्यवाही करेल, असे प्रशासनाच्यावतीने आश्वासन दिलें. या बैठकीस स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या बैठकीस माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य अभिजीत चव्हाण, ज्येष्ठ समाजसेवक प्रमोद धुरी, शाखा प्रमुख व टी विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *